महाराष्ट्रात काँग्रेसला मोठ्या निर्णयाचे अधिकार नाहीत, राहुल गांधींच्या वक्तव्याने खळबळ

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठ्या निर्णयाचे अधिकार नाहीत, राहुल गांधींच्या वक्तव्याने खळबळ

पंजाब, छत्तिसगड आणि राज्यस्थानमध्ये आम्ही तातडीने निर्णय घेऊ शकतो. पण महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 26 मे: राज्यातल्या महाविकास आघाडीच्या स्थैर्याबाबत चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत आहे, मात्र आम्हाला मोठे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत असं त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारने महाराष्ट्राला आणखी मदत केली पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नाराज असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राहुल गांधी म्हणाले, कोरोनाची राज्यातली स्थिती गंभीर आहे. दाट वस्ती आणि प्रचंड मोठ्या लोकसंख्येमुळे महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडली आहे. राज्य सरकार त्यांचं काम करत आहे. काँग्रेस राज्यात सत्तेत असली तरी मोठे निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. पंजाब, छत्तिसगड आणि राज्यस्थानमध्ये आम्ही तातडीने निर्णय घेऊ शकतो. पण महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे.

केंद्र सरकारने राज्य सरकारला आणखी मदत केली पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात तापलेल्या वातावरणात आणखी भर पडली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी राज्यात काँग्रेसचं नाही तर शिवसेनेचं सरकार आहे असं वक्तव्य केलं होतं. सत्तेत सहभागी असतानाही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याची चर्चा व्यक्त होत आहे.

महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत शरद पवाराचं मोठं विधान, म्हणाले...

 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत उत्तम समन्वय असल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, 'आमचे सरकार स्थिर आहे. तिन्ही पक्षाचे नेते समन्वय साधून काम करत आहे. लोकं विनाकारण गैरसमज निर्माण करण्याचे काम करत आहे', असा स्पष्ट खुलासा केली आहे.

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यांच्या मागणीनंतर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी राज्यपालांची भेट घेतली त्यानंतर मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली.

हेही वाचा -पुढचे 5 दिवस या राज्यांसाठी धोक्याचे, हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती

तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.  'सरकारच्या स्थिरतेविषयी विनाकारण गैरसमज निर्माण केला जात आहे. पण आमचे महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. आमच्यात समन्वय नाही अशी कोणतीही बाब नाही. आमची रोज अनेक वेळा चर्चा होत असते, भेठीगाठी होत असतात. त्यामुळे सरकार अस्थिर असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे',  असं थोरात म्हणाले.

First published: May 26, 2020, 3:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading