Home /News /national /

पंतप्रधान मोदी 'या' तारखांना पुन्हा करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा, सगळ्या देशाचं लागलं लक्षं

पंतप्रधान मोदी 'या' तारखांना पुन्हा करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा, सगळ्या देशाचं लागलं लक्षं

New Delhi: Prime Minister Narendra Modi addresses the nation on COVID-19 via a video link, in New Delhi, Tuesday, April 14, 2020. PM Modi announced extension of the ongoing lockdown till May 3.(PIB/PTI Photo)(PTI14-04-2020_000210B)

New Delhi: Prime Minister Narendra Modi addresses the nation on COVID-19 via a video link, in New Delhi, Tuesday, April 14, 2020. PM Modi announced extension of the ongoing lockdown till May 3.(PIB/PTI Photo)(PTI14-04-2020_000210B)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 17 जून रोजी चर्चेत सहभागी होणार आहेत. या चर्चेनंतर पंतप्रधान कुठला निर्णय जाहीर करतात याकडे सगळ्या देशाचं लक्षं लागलं आहे.

    नवी दिल्ली 12 जून : दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊन नंतर देश आता पूर्वपदावर येत आहे. व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र व्यवहार सुरळीत होत असतानाच देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात दररोज दहा हजारांच्या आसपास संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत. 16 आणि 17जूनला ते दोन टप्प्यात चर्चा करणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 17 जून रोजी चर्चेत सहभागी होणार आहेत. या चर्चेनंतर पंतप्रधान कुठला निर्णय जाहीर करतात याकडे सगळ्या देशाचं लक्षं लागलं आहे. दरम्यान, राज्याला कोरोना व्हायरसचे हादरे सुरुच आहेत. आजही राज्यात 3493 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा 1 लाख 1 हजार 141 वर गेला आहे. तर राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 127 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या  3717वर गेली आहे. आजही मुंबईत सगळ्यात जास्त  90 जणांचा मृत्यू झाला.  दिवसभरात 1718 रुग्ण बरे झाले. तर राज्यात एकूण 47796 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 47.3 एवढं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेले काही दिवस राज्यात 3 हजारांच्या आसपास रुग्ण सापडत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये ही वाढ अशीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता पावसाळ्याची सुरूवात होणार असल्याने पुन्हा इतर साथीचे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. सावधान! होम क्वारंटाइन असलेल्यांवर आता नजर ठेवणार 'तिसरा' डोळा! जुलै आणि ऑगस्टमध्ये हा कोरोना रुग्णांचा संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हाच धोका ओळखून मुंबई आणि दिल्लीतल्या बड्या सोसायट्यांनी आता पुढाकार घेत आपल्याच परिसरात आरोग्य सुविधा उभ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातले निम्मे कोरोनारुग्ण हे राज्यात आणि राज्यातले निम्मे रुग्ण हे फक्त एकट्या मुंबईत आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या दुष्टीने मुंबई हा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट बनला आहे. मुंबईतल्या कोरोनाबधितांच्या आकड्याने 55 हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत एकूण 55 हजार 451 एवढे कोरोना रुग्ण आहेत. तर मृतांच्या आकड्यानेही 2 हजारांचा टप्पा पार केला आहे, मुंबईत आत्तापर्यंत 2044 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात आज 90 जणांचा मृत्यू झाला. जत्रेसाठी जमले शकडो लोक, कोरोना पसरण्याची भीती, VIDEO पाहून येईल अंगावर काटा राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, अकोला, नागपूर, मालेगाव या शहारांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असून ते आता धोकादायक हॉटस्पॉट बनले आहेत. मुंबईत तर तब्बल 11 लाखांपेक्षा जास्त घरांना सील करण्यात आलं आहे. संपादन - अजय कौटिकवार
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Coronavirus, Narendra modi

    पुढील बातम्या