Home /News /national /

बापरे! जत्रेसाठी जमले शकडो लोक, कोरोना पसरण्याची भीती, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

बापरे! जत्रेसाठी जमले शकडो लोक, कोरोना पसरण्याची भीती, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

गर्दीतून देवाची बैलगाडी धावत होती आणि लोक त्या मागे सैरावैरा पळ होते हे दृष्य पाहून कुणाच्याही अंगावर काटा आल्याशीवाय राहणार नाही.

    बंगळूरू 12 जून: कोरोनाचा प्रसार होत असल्याने गर्दी करू नये असं सरकार वारंवार सांगत आहे. सण, समारंभ, उत्सव, धार्मिक कार्यक्रम यावर बंदी घातली आहे. मात्र सरकारचे सगळे नियम धाब्यावर बसवून कर्नाटकात एका जत्रेसाठी शेकडो लोक जमले होते. हावेरी जिल्ह्यातल्या करजागी इथं इथं ही जत्रा झाली. या घटनेने प्रशासन हादरलं आहे. आता आयोजकांवर पोलीस कारवाई होणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळा, एकमेकांच्या जवळ येऊ नका, मास्क वापरा अशी सक्ती सरकारने केली आहे. मात्र या ठिकाणी हे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले. लोक रस्त्यावर जमले होते त्याचबरोबर घरांच्या छतावरही गर्दी करून लोक उभे होते. यासाठी पोलिसांची कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. गर्दीतून देवाची बैलगाडी धावत होती आणि लोक त्या मागे सैरावैरा पळ होते हे दृष्य पाहून कुणाच्याही अंगावर काटा आल्याशीवाय राहणार नाही. पोलीस आता या जत्रेची आणि लोकांच्या सहभागाची चौकशी करत असून आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सध्या देशातील सात राज्यात दहा हजाराहून अधिक नवी प्रकरण पुढे आलेले आहेत. यासह, देशातील सर्वाधिक संक्रमित राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश  पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. हरियाणामध्ये अवघ्या चार दिवसांत 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हरियाणामध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या 7 जूनपर्यंत कोरोनामधून राज्यात केवळ 24 जणांचा मृत्यू झाला होता पण 11  जून रोजी हा आकडा 52 झाला. उत्तर प्रदेशामध्ये  दोन दिवसांत विक्रमी मृत्यूची नोंद झाली आहे.  उत्तर प्रदेशामध्ये 31  मेपर्यंत 201 लोकांचा मृत्यू झाला होता. परंतु, गुरुवारपर्यंत 321  लोकांचा मृत्यू झाला होता.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Coronavirus, Karnataka

    पुढील बातम्या