जाहिरात
मराठी बातम्या / देश / Omicron ची टेस्ट घरी करणे शक्य आहे का? जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

Omicron ची टेस्ट घरी करणे शक्य आहे का? जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

Omicron ची टेस्ट घरी करणे शक्य आहे का? जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

घरगुती कोरोना चाचणी किट्सच्या (Detect Omicron with home test) मदतीने ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समजू शकते का, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे. यासंदर्भात तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 3 जानेवारी: कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन व्हेरियंट हा अल्पावधीतच जगभरात पसरला आहे. यामुळे जगभरात कोरोना चाचण्यांची (Corona Tests) मागणी वाढली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची (Omicron Variant) लागण झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी लोक पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी केंद्रांवर रांगा लावून उभे आहेत. अशात घरगुती कोरोना चाचणी किट्सच्या (Detect Omicron with home test) मदतीने ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समजू शकते का, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे. कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथोलॉजिस्टच्या प्रेसिडेंट एमिली वॉल्क यांनी याबाबत अधिक माहिती दिली. कोविड-19 च्या संक्रमणाबाबत माहिती घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या रॅपिड अँटीजेन (Rapid antigen test) आणि आरटी-पीसीआर (RT-PCR test) या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांनी कोरोनाच्या अल्फा, डेल्टा किंवा ओमिक्रॉन अशा कोणत्याही व्हेरियंटची (Corona tests to detect Omicron) माहिती मिळू शकते, असे त्या म्हणाल्या.

    अर्थात, अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज अडमिनिस्ट्रेशनने या आठवड्यात म्हटले होते, की रॅपिड चाचण्या जरी कोरोनाच्या इतर व्हेरियंट्स ओळखण्यासाठी सक्षम असल्या तरी ओमिक्रॉनच्या बाबतीत त्या कमी पडत आहेत.

    घरगुती चाचण्या गरजेच्या

    अमेरिकेचे महामारी तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती चाचण्या या कोरोना ओळखण्यासाठी पुरेशा असल्या, तरी ओमिक्रॉनच्या बाबतीत त्या तितक्या प्रभावी (Home tests not enough for Omicron) नाहीत. मात्र, कोरोनाचा धोका अजूनही टळला नसल्यामुळे घरगुती चाचण्याही गरजेच्या आहेत. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे का हे तातडीने माहिती करून घेण्यासाठी घरगुती चाचणी फायद्याची (Home tests important to detect Covid-19) आहे. मोठी बातमी ! मुंबई-दिल्लीहून पश्चिम बंगालला जाणाऱ्या फ्लाईट्सवर निर्बंध अमेरिकेतील सरकारी संस्था आणि वैज्ञानिक या दोन्हींचे घरगुती चाचण्यांच्या वापरावर एकमत आहे. एखाद्या व्यक्तीला सर्दी-पडसे किंवा घशात खवखव होत असेल, तर घरगुती चाचणीमधून त्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याची खात्री करून घेणे कधीही चांगले, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कोरोनाची लागण झाल्याचे नक्की झाल्यानंतर व्यक्तीवर उपचार सुरू करून ओमिक्रॉन किंवा अन्य व्हेरियंट्स बाबत चाचणी केली जाऊ शकते. औरंगाबाद: अखेरच्या घटका मोजणाऱ्या लेकीला आईनं दिलं जीवनदान; हृदय पिळवटणारी घटना दरम्यान, रुग्णालयांमध्ये आणि सरकारी केंद्रांवर अजूनही कोरोनाच्या तपासणीसाठी रॅपिड अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचण्यांचा वापर केला जातो आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार वाढत असल्यामुळे जगभरात पुन्हा एकदा निर्बंध लागू होत आहेत. ओमिक्रॉन व्हेरियंट हा अधिक संसर्गजन्य असला, तरी तो डेल्टा व्हेरियंटएवढा घातक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात