Home /News /aurangabad /

अखेरच्या घटका मोजणाऱ्या लेकीला आईनं दिलं जीवनदान; औरंगाबादमधील हृदय पिळवटणारी घटना

अखेरच्या घटका मोजणाऱ्या लेकीला आईनं दिलं जीवनदान; औरंगाबादमधील हृदय पिळवटणारी घटना

Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील एका 63 वर्षीय आईने आपल्या 40 वर्षीय विवाहित मुलीला जीवनदान दिलं आहे.

    सिल्लोड, 03  जानेवारी: आई आणि बाळाचं नातं हे जगातील सर्वात मजबूत नातं मानलं जातं. आपल्या बाळावर एखादं संकट आलं तर आई आपल्या जीवाची पर्वा न करता, बाळाला संकटातून बाहेर काढते. अशीच एक घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील सिल्लोड याठिकाणी घडली आहे. येथील एका 63 वर्षीय आईने आपल्या 40 वर्षीय विवाहित मुलीला किडनी देत जीवनदान (Mother saved daughter's life by donating kidney) दिलं आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलीवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. त्यामुळे मुलीला नवीन जीवनदान मिळालं आहे. सिल्लोड तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी असणाऱ्या छाया अशोक झरवाल या गेल्या तीन वर्षांपासून किडनीच्या विकाराने ग्रस्त होत्या. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांचा हा त्रास वाढतच चालला होता. त्यामुळे त्या डायलिसिस प्रक्रियेवर जगत होत्या. पण डायलिसिसची प्रक्रिया छाया यांना जास्त दिवस वाचवू शकणारी नव्हती. हेही वाचा- 'आई, मला माफ कर...' सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची आत्महत्या, नाशकातील खळबळजनक घटना त्यामुळे छाया यांचा जीव वाचवण्यासाठी किडनी प्रत्यारोपण करणं हाच एकमेव पर्याय उपलब्ध होता. पण घरची परिस्थिती जेमतेम असल्याने हा खर्च छाया यांच्या घरच्यांना परवडणारा नव्हता. लेकीला किडनीची गरज असल्याचं कळल्यानंतर, छाया यांच्या 63 वर्षीय आई रुखमनबाई माहोर यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, त्वरित किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. हेही वाचा- वंशाच्या दिव्यांना अंत्यसंस्कारापासून रोखलं; मुलींनीच आईला दिला खांदा, कारण वाचून पाणवतील डोळे यानंतर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात छाया यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 63 वर्षीय आईनं आपला जीव धोक्यात घालून आपल्या लेकीला किडनी दान केल्यानं अनेकांना गहिवरून आलं. नवीन वर्षाच्या पहिल्याचं दिवशी आईनं लेकीला नवीन जीवन दिल्यानं अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news

    पुढील बातम्या