Home /News /national /

Covid vaccine: कोरोना प्रतिबंधक लसींवर चोरांचा डल्ला, सरकारी रुग्णालयातून 320 डोसची चोरी

Covid vaccine: कोरोना प्रतिबंधक लसींवर चोरांचा डल्ला, सरकारी रुग्णालयातून 320 डोसची चोरी

Covaxin stolen from government hospital: चोरट्यांनी चक्क कोरोना प्रतिबंधक लसींवरच डल्ला मारला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    जयपूर, 14 एप्रिल: राजस्थानमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचा (Covid vaccine) तुटवडा निर्माण झाल्याचं सांगण्यात येत असताना आता एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानची राजधानी जयपूर (Jaipur, Rajasthan) येथील एका सरकारी रुग्णालयातून चक्क कोरोना प्रतिबंधक लसींची चोरी (Covid vaccine theft) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. भास्कर डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी जयपूर येथील एका सरकारी रुग्णालयातील कोल्ड स्टोरेजमधून भारत बायोटेक (Bharat Biotech)ने तयार केलेल्या कोवॅक्सिन लसींच्या (Covaxin vaccine) 32 वायलची चोरी झाल्याचं समोर आलं आहे. एका वायलमध्ये 10 डोस असतात आणि अशा प्रकारे एकूण 320 डोसेसची चोरी झाली आहे. या प्रकरणी रुग्णालयाकडून शास्त्री नगर पोलीस ठाण्यात वॅक्सिन चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना प्रतिबंधक लस 12 एप्रिल रोजी गायब झाल्या होत्या. दोन दिवसांनंतर आज सकाळी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटलं आहे की, सीएमएचओ ऑफिसकडून सांगण्यात आले की, भारत बायोटेकने निर्मित कोवॅक्सिनच्या 32 वायल हरवल्या आहेत. या प्रकरणात रुग्णालयाकडून चूक झाली आहे की लस सीएमएचओ कार्यालयातून वाहतूक करताना गहाळ झाली आहे हे अद्याप माहिती नाही. VIDEO: निर्बंध मोडल्याने पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा ठिय्या सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, रुग्णालयाकडून तक्रार दाखल करण्यात आल्यावर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालय परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासरणी करण्यात येणार आहे. जर रुग्णालयातील एखादा कर्मचारी यामध्ये सहभागी असेल तर त्याच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. लसीकरण केंद्राचे नोडल अधिकारी म्हणाले, लसीकरण केंद्रावर येणाऱ्या सर्व लसींची नोंदणी करण्यात येते आणि त्याचा संपूर्ण रेकॉर्ड आहे. त्यामुळे असा संशय आहे की, या लसी स्टोअरमधून गायब झाल्या असाव्यात. बुधवार सकाळपर्यंत राजस्थानात केवळ 4 लाख डोस शिल्लक राजस्थानमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे. बुधवार सकाळपर्यंत राजस्थानमध्ये सुमारे 4 लाख डोस शिल्लक होते. आता रात्री उशिरापर्यंत 2 लाख डोस उपलब्ध होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
    First published:

    Tags: Corona vaccine, Crime, Rajasthan

    पुढील बातम्या