Home /News /aurangabad /

VIDEO: निर्बंध मोडल्याने पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा ठिय्या

VIDEO: निर्बंध मोडल्याने पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा ठिय्या

पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह पोलीस ठाण्यातच आणून ठेवला आहे. कोरोना निर्बंधांचे पालन न केल्याने पोलिसांनी कारवाई न करता मारहाण केल्याचा या नातेवाईकांचा आरोप आहे

औरंगाबाद, 14 एप्रिल: पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह पोलीस ठाण्यातच आणून ठेवला आहे. औरंगाबादमधील (Aurangabad) उस्मानापुरा पोलीस ठाण्यामध्ये ही घटना घडली आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत मृताच्या नातेवाईकांनी याठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शेकडो नागरिकांनी पोलीस  ठाण्यांच्या आवारात गर्दी केली. फिरोज खान कादिर खान असे मृताचे नाव आहे. कोरोनाचा (Corona cases in Maharashtra) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, विविध ठिकाणी निर्बंध (Curfew) लागू करण्यात आले आहेत. उस्मानपुरा परिसरातही अशाप्रकारे निर्बंध लागू करण्यात आले होते. फिरोज यांचे उस्मानपुरा परिसरात सलून आहे. ते यावेळी सुरू असल्याने पोलिसांनी कठोर कारवाई केल्याची माहिती मिळते आहे. याठिकाणी निर्बंध असताना फिरोज खान यांचे दुकान चालु होते, त्यावेळी कारवाई न करता खान याना मारहाण केली गेली आणि या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप खान यांच्या नातेवाईकांनी केला आहे. फिरोज खान यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर ठेवला आहे. (हे वाचा-दिल्लीचा महत्त्वाचा बॉलर कोरोना पॉझिटिव्ह, रबाडाबरोबर केला होता 7 तासांचा प्रवास) पोलीस ठाण्यासमोर न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत दोषी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकानी घेतली आहे. फिरोज यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित केले जाऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी हे नातेवाईक करत आहेत. नागरिकांचा ठिय्या नियंत्रणात आणण्यासाठी  वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि दंगा काबू पथक याठिकाणी दाखल झाले आहे. उस्मानापुरा पोलीस ठाण्याच्या आवारात शेकडो नागरिकांनी गर्दी असून पोलीस नातेवाईकांची समजून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Corona, Corona hotspot, Corona spread, Crime, Police action

पुढील बातम्या