कोरोनाच्या लशीबाबात केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, संपूर्ण देशाला मिळणार मोफत लस

कोरोनाच्या लशीबाबात केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, संपूर्ण देशाला मिळणार मोफत लस

कोरोना लशीसंदर्भात वाढलेला राजकीय संघर्ष पाहता आता केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी मोठे विधान केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात बिहारच्या जनतेला सत्तेत आल्यावर मोफत लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात लशीवर पुन्हा एकदा गदारोळ सुरू झाला. विरोधी पक्षांसह अनेक राज्य सरकारांनी सरकारच्या या आश्वासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला घेराव घातला. कोरोना लशीसंदर्भात वाढलेला राजकीय संघर्ष पाहता आता केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी मोठे विधान केलं आहे.

बिहारच नाही तर देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत मिळणार. ओडिशाच्या बालासोरमध्ये केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी म्हणाले की याविषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा सुरू आहे.

वाचा-पॉझिटिव्ह बातमी ! कोरोना आला आणि ‘हा’ जीवघेणा आजार कमी झाला

साधारण एका व्यक्तीला कोरोनाची लस देण्याचा खर्च साधारण 500 रुपये आहे. बालासोरमध्ये पोटनिवडणूक होणार असून प्रताप सारंगी तेथे प्रचारासाठी गेले होते तेव्हा त्यांनी या संदर्भात मोठं विधन केल्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

वाचा-कोरोनानं लेदर बॉलप्रमाणे रुग्णाच्या फुफ्फुसांची अवस्था, पाहा X-ray रिपोर्ट

देशात काय आहे कोरोनाची स्थिती?

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45 हजार 149 नवीन रुग्ण आढळले असून आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 79,09,960 वर पोहोचला आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 480 लोकांचा मृत्यू झाला आहे. 6,53,717 रुग्णांवर देशात कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर 59,105 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जवळपास 14 हजार रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 26, 2020, 12:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading