कोरोनानं लेदर बॉलप्रमाणे केली फुफ्फुसांची अवस्था, भारतातील रुग्णाचा भयंकर X-ray रिपोर्ट आला समोर

कोरोनानं लेदर बॉलप्रमाणे केली फुफ्फुसांची अवस्था, भारतातील रुग्णाचा भयंकर X-ray रिपोर्ट आला समोर

कोव्हिड-19 मुळे फुफ्फुसांचे काय होते याचे एक भयावह उदाहरण कर्नाटकात पाहिले गेले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे रुग्णाच्या श्वसन यंत्रणेत ( रेस्फिरेटरी सिस्टम) विषाणू प्रवेश करतात हे फुफ्फुसाला नष्ट करून रुग्णाची अवस्था गंभीर करतात. कोव्हिड-19 मुळे फुफ्फुसांचे काय होते याचे एक भयावह उदाहरण कर्नाटकात पाहिले गेले आहे. येथे 62 वर्षांच्या कोरोनाला संसर्ग झाल्यानंतर फुफ्फुसांना 'लेदर बॉल' सारखे कडक बनले होते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, फुफ्फुसांची अशी वाईट अवस्था झाल्यानंतर रुग्णाचा मृत्यू झाला. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की रुग्णाच्या मृत्यूच्या 18 तासांनंतर, त्याच्या नाक आणि घशात व्हायरस सक्रिय होता. म्हणजेच, संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतरही, शरीरावरच्या विषाणूमुळे इतर लोक आजारी पडू शकतात.

वाचा-खुलासा! Corona तून रिकव्हरीनंतर किती महिन्यांपर्यंत शरीरात राहू शकते अँटीबॉडी?

ऑक्सफोर्ड मेडिकल कॉलेजचे डॉक्टर दिनेश राव म्हणाले की कोरोनामुळे या रुग्णाची फुफ्फुसे लेदरच्या बॉलप्रमाणे कडक झाली होती. फुफ्फुसात हवा भरणार यंत्रणा खराब झाली आणि पेशींमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या.

वाचा-पुणेकरांनी करून दाखवलं, कोरोना Recovery Rate मध्ये देशात पहिला नंबर!

रिपोर्टनुसार, डॉ. राव यांनी शरीर, नाक, घसा, फुफ्फुसातील पृष्ठभाग, श्वसन पॅसेज आणि चेहऱ्यावरच्या आणि घशातील त्वचेवरुन पाच प्रकारचे स्वॅब नमुने घेतले. RTPCR चाचणीत असे दिसून आले की घशातील आणि नाकाचा नमुना कोरोनासाठी पॉझिटिव्ह होता. याचा अर्थ असा आहे की कोरोना रूग्णाचा मृतदेह इतरांना संक्रमित करू शकतो. मात्र, मृतदेहाच्या त्वचेतून घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह होते.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या रुग्णाच्या शरीराची तपासणी कुटूंबाच्या संमतीने केली गेली. डॉ. राव म्हणाले की, शरीर तपासणीनंतर तयार केलेला माझा रिपोर्ट अमेरिका आणि ब्रिटनमधील रिपोर्टपेक्षा अगदी वेगळा आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की भारतात दिसणारी कोरोना विषाणूची प्रजाती इतर देशांपेक्षा वेगळी आहे.

वाचा-‘कोरोना’वरच्या उपचारासाठी फडणवीस सरकारी हॉस्पिटलमध्ये; आधीच दिली होती सूचना

7 महिन्यांपर्यंत शरीरात राहतात अँटीबॉडीज

एक नव्या अभ्यासानुसार कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात नोवेल कोरोना व्हायरस संक्रमणाविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडी तत्व या आजाराची लक्षण दिसल्यानंतर सुरुवातीच्या तीन आठवड्यात अत्यंत जलद गतीने विकसित होतात आणि आजाराची लागण झाल्यानंतर सात महिन्यांपर्यंत शरीरात असतात. अँटीबॉडी शरीरातील ते तत्व आहे ज्याचा निर्माण शरीरातील रोग प्रतिकारक प्रणाली व्हायरसचा परिणाम होऊ देत नाही. कोरोना वायरसची लागण झालेल्या 300 जणं आणि यातून बरे झालेल्या 198 लोकांवर केलेल्या संशोधतानू ही बाब समोर आली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 25, 2020, 9:34 AM IST

ताज्या बातम्या