राजकोट, 19 मे : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतानं एक लाकांचा आकडाही पार केला आहे. या सगळ्यात रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची मागणी वाढली आहे. मात्र गुजरातमधील राजकोटच्या एका कंपनीनं तयार केलेला व्हेंटिलेटर रुग्णांवर उपचार करण्यात अयशस्वी ठरला आहे. राजकोट येथील ज्योती सीएनसी या कंपनीने कोव्हिड-19 रूग्णांसाठी व्हेंटिलेटरचे विशेष डिझाइन केले होते. याला धामण -1 असे नाव देण्यात आले होते. याची किंमत एक लाख रुपये निश्चित करण्यात आली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी स्वत: पत्रकार परिषदेत व्हेंटिलेटरविषयी माहिती दिली. मात्र, आता अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याशी झालेल्या बैठकीत म्हटले आहे की, हे स्वदेशी व्हेंटिलेटर धामण -1 कोव्हिड-19 रुग्णांवर प्रभावी सिद्ध होत नाही आहे. त्यामुळं या व्हेंटिलेटरचा वापर केला जाणार नाही. यासह, 100 उच्च-अंत आयसीयू व्हेंटिलेटरची त्वरित मागणी देखील करण्यात आली. वाचा- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, लॉकडाउन 4 सुरू झाल्यानंतर ‘हे’ झाले बदल व्हेंटिलेटर पूर्ण नाही त्याचबरोबर धामण -1 बनविणार्या ज्योती सीएनसीचे मालक परकरामसिंग जडेजा यांचे म्हणणे आहे की ते पूर्ण व्हेंटिलेटर नाही आणि त्याबद्दल राज्य सरकारलाही कळविण्यात आले. व्हेंटिलेटरमध्ये अनेक पद्धती आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आहेत. आम्ही धामण-3 बनवित आहोत जो संपूर्ण व्हेंटिलेटर आहे. वाचा- ICMRने कोरोना टेस्टच्या नियमात केले मोठे बदल, आता ‘या’ लोकांचीही होणार चाचणी ICMRने केले नियमात बदल इंडियन कॉउन्सिल ऑफ मेडिलक रिसर्चनं (ICMR) कोरोना तपासणीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहे. आता प्रवासी मजूर, रुग्णालयात असलेले कोरोना रुग्ण आणि फ्रंट लाइनवर काम करणारे लोकांच्या तपासणीसाठी नियमाद बदल करण्यात आले आहेत. ICMRने सोमवारी सांगितले की प्रवासी आणि घरी परतणाऱ्या लोकांमध्ये जर इन्फ्लूएन्झा सारख्या आजाराची लक्षणं दिसली तर सात दिवसांच्या आत त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना किंवा फ्रंट लाइनवर काम करणाऱ्यांमध्ये इन्फ्लूएन्झा सारख्या रोगाचे (ILI) लक्षणं दिसल्यास त्यांची ही RT-PCR चाचणी केली जाणार. याव्यतिरिक्त, एखाद्या संक्रमित रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या आणि अंत्यत गंभीर परिस्थिती राहणाऱ्यांना, ज्यांना लक्षणं दिसत नाहीत, यांच्यावर संपर्कात आल्यानंतर पाचव्या आणि दहाव्या दिवसाच्या दरम्यान तपासणी केली जाईल. वाचा- आजपासून पुण्यातलं सगळ्यात मोठं मार्केट बंद, कोरोनाच्या उद्रेकामुळे निर्णय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.