मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, एका चुकीमुळे नवजात बाळासह महिलेची सुरु आहे धडपड

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, एका चुकीमुळे नवजात बाळासह महिलेची सुरु आहे धडपड

मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 69 टक्के पुरुष आहेत तर 31 टक्के महिला आहेत.

मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 69 टक्के पुरुष आहेत तर 31 टक्के महिला आहेत.

महिलेनं एका बाळाला जन्म दिल्यानंतर श्वास घ्यायला त्रास झाला. त्यानंतर महिलेची कोरोना टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं होतं.

  • Published by:  Suraj Yadav

भोपाल, 21 एप्रिल : कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात  लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या भीतीमुळे आणि प्रशासनाच्या एका चुकीमुळे एका दुध पिणाऱ्या लहान बाळाला आणि तिच्या आईला त्रास सहन लागत आहे. बाळाची आई, वडिल आणि कुटुंब  या सर्व प्रकारामुळे चिंतेत आहे.

राजगढमधील कोरोनाचे हे प्रकरणं आहे. 18 एप्रिलला राजगढमध्ये कोरोनाचं पहिलं प्रकरण समोर आलं. जीरापुर तालुक्यातील काछीखेडा गावात एक गर्भवती महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. या महिलेनं एका बाळाला जन्म दिल्यानंतर श्वास घ्यायला त्रास झाला. त्यानंतर महिलेची कोरोना टेस्ट करून त्याचे नमुने भोपाळला पाठवण्यात आले. भोपाळमधून महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर महिलेचं गाव सील करून सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आलं.

दरम्यान, राजगढमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली. गडबडीतच जिल्हाधिकाऱी नीरज सिंग यांनी महिलेसह मुलाला आणि तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे नमुने चाचणीसाठी पाठवले. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. महिलेला भोपाळला एम्समध्ये जाण्यास सांगितलं. तिथं रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर महिलेला हमीदिया इथं जाण्यासं सांगितलं. मात्र हमिदियात महिलेला दाखल करून न घेता तिथून गावी पाठवलं.

हे वाचा : 'ते आपल्यासाठी झटतात म्हणून ही मदत', नारळ तोडणारा कामगार करतोय पोलिसांची सेवा

महिलेला गावी जायला सांगितलं पण आधीपासूनच गाव सील करण्यात आलं होतं. तिला गावात घेतलं नाही आणि परत राजगढला पाठवण्यात आलं. ज्या दिवशी ती पॉझिटिव्ह असल्याचं समजलं तेव्हापासून ति मुलासह फिरत आहे. महिलेला कोरोना आहे की नाही हे समजून घेण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. दरम्यान दुसऱ्या बाजूला सरकारी डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीनंतर चुकीची वागणूक दिल्याचा आरोप करत संपावर जाण्याचा इशारा दिला होता.

हे वाचा : रॅपिड टेस्टिंगवर 2 दिवस बंदी; निकालातील गोंधळामुळे ICMR कडे तक्रार

संपादन - सूरज यादव

First published:

Tags: Coronavirus