जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! सकाळी केले आईवर अंत्यसंस्कार, संध्याकाळी रुग्णालयातून शव घेऊन जाण्यासाठी आला फोन

धक्कादायक! सकाळी केले आईवर अंत्यसंस्कार, संध्याकाळी रुग्णालयातून शव घेऊन जाण्यासाठी आला फोन

धक्कादायक! सकाळी केले आईवर अंत्यसंस्कार, संध्याकाळी रुग्णालयातून शव घेऊन जाण्यासाठी आला फोन

गाझियाबादमधील एकाच दिवशी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मात्र नातेवाईकांना मृतदेह सोपवताना मृतदेहाची अदलाबदली झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

गाझियाबाद, 09 जुलै : देशातील कोरोनाबाधितांची (COVID-19) संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी मृतांचा आकडा कमी आहे. मात्र रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे धक्कादायक प्रकार देशात घडत आहेत. ते म्हणजे मृतदेहांची अदलाबदली. बुधवारी नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात मृतहेदांची अदलाबदली झाल्यानंतर आज उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्येही असाच प्रकार घडला. गाझियाबादमधील एकाच दिवशी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मात्र नातेवाईकांना मृतदेह सोपवताना मृतदेहाची अदलाबदली झाली. वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, एका मृताच्या मुलीनं याबाबत तक्रारी केली आहे. या मुलीनं सांगितले की, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात तिच्या आईला दाखल करण्यात आले होते. कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मात्र उपचारादरम्यान 5 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी आणखी एका महिलेचा मृत्यू झाला होता. (हे वाचा- भारतावरील कोरोनाचं संकट आणखी गडद, रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ ) एम्स रुग्णालयानं त्यांना मृतदेह देताना दुसऱ्याच महिलेला दिला. मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेला असल्यामुळं त्यांना ओळख पटवता आली नाही. 6 जुलै रोजी सकाळी महिलेच्या कुटुंबानं मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यादिवशी सायंकाळी त्यांना रुग्णालयातून फोन आला की, तुमच्या आईचा मृतदेह शवगृहात ठेवला आहे.

जाहिरात

एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या मुलीनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांना देण्यात आलेला मृतदेह हा एका मुस्लीम महिलेचा होता. एम्स प्रशासनाचा निष्काळजीपणा दरम्यान मुस्लीम महिलेच्या कुटुंबाने एम्स प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर कुटुंबिय जेव्हा एम्स प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तेथील सुरक्षा रक्षक आणि बाउन्सर्सनी त्यांना धमकी दिली. दरम्यान, आता एम्स प्रशासनानं सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. (संबंधित- मृतदेहाची अदलाबदली, हिंदू परिवारानं केले मुस्लीम महिलेवर अंत्यसंस्कार)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात