भारतावरील कोरोनाचं संकट आणखी गडद, रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ

भारतावरील कोरोनाचं संकट आणखी गडद, रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 7 लाख 67 हजार 296 झाली आह. बुधवारी नवीन रुग्णांच्या आकड्यात घट झाल्यानंतर आज पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 जुलै : देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यानं आज उच्चांक गाठला. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 24 हजार 879 नवीन रुग्णांची नोंद झाली.तर, 487 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 7 लाख 67 हजार 296 झाली आह. बुधवारी नवीन रुग्णांच्या आकड्यात घट झाल्यानंतर आज पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आता 2 लाख 69 हजार 789 सक्रीय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 21 हजार 129 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत 4 लाख 76 हजार 377 रुग्ण निरोगीही झाले आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार बुधवारी देशात 1 कोटी 4 लाख 73 हजार 771 चाचण्या झाल्या आहेत. यातील सर्वात जास्त 2 लाख 62 हजार 679 रुग्णांची चाचणी 7 जुलै रोजी करण्यात आली.

वर्ल्डोमीटरनं दिलेल्या आकडेवारीनुसार, जगात एक कोटी 21 लाख 55 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 5 लाख 51 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 70 लाखांहून अधिक लोकं निरोगी झाले आहेत. जगभरात 45 लाख 79 हजार सक्रिय रुग्ण आहेत.

दिलासा देणारी आकडेवारी

देशातील निरोगी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सक्रिय रुग्ण आणि निरोगी रुग्ण यांच्यातील फरक आता 2 लाख 06 हजार 588 झाला आहे. दुसरीकडे दिल्लीतील सक्रिय रुग्णांची संख्या 25 हजारांपेक्षा कमी झाला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत दिल्लीचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त आहे. दिल्लीचा रिकव्हरी रेट 74.6% झाला आहे. महाराष्ट्रातील नवीन कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: July 9, 2020, 10:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading