Home /News /national /

मोठी बातमी! भारतात आता लहान मुलांनाही दिली जाणार कोरोना प्रतिबंधक लस, तीन लसींना मान्यता

मोठी बातमी! भारतात आता लहान मुलांनाही दिली जाणार कोरोना प्रतिबंधक लस, तीन लसींना मान्यता

SARS-COV-2 या विषाणूचा मुलांना असलेला धोका लक्षात घेत, भारतीय औषध नियंत्रक संस्थेने (Drug Controller General of India) आपत्कालीन वापरासाठी तीन लसींना (Vaccine) परवानगी दिली आहे.

    नवी दिल्ली, 26 एप्रिल : SARS-COV-2 या विषाणूचा मुलांना असलेला धोका लक्षात घेत, भारतीय औषध नियंत्रक संस्थेने (Drug Controller General of India) आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन (Covaxin), बायोलॉजिकल ईच्या कॉर्बेवॅक्स (Corbevax) आणि झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी (Zycov-D) या तीन लसी (Vaccine) लहान मुलांना देण्याची परवानगी दिली आहे. देशभरातल्या टियर -1 शहरांत मुलांमध्ये कोविड-19 चा संसर्ग वाढत असल्याचं शाळांच्या अहवालांमधून दिसून आलं आहे. 'डीसीजीआय'ने (DCGI) या लसींना मान्यता दिली असल्याने आता शाळांतील मुलांना लस देणं सोयीचं होईल आणि शाळकरी मुलं कोविड संसर्गापासून सुरक्षित राहतील. 6 ते 12 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी कोवॅक्सिन लसीला तर 5 ते 12 वयोगटातल्या मुलांसाठी कॉर्बेवॅक्स या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच झायकोव्ह-डी ला 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी देशाच्या सर्वोच्च औषध नियामकाकडून (Drug Controller) आपत्कालीन वापरासाठी (Emergency Use) परवानगी मिळालेली आहे. 'हे स्वागतार्ह पाऊल आहे', अशी प्रतिक्रिया मेदांताचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नरेश त्रेहान यांनी दिली आहे. "हा एक असुरक्षित असा वयोगट होता. आता प्रौढ व्यक्तीही सुरक्षित राहतील. यामुळे तुम्ही लसींमध्ये शॉर्टकट घेता येईल, असं समजण्याचं कारण नाही. या लसींची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यात आली आहे", असं त्रेहान यांनी सांगितलं. (Karachi Bomb Blast मागे महिलेचा हात; आत्मघातकी हल्ला करणाऱ्या बाईचा VIDEO आला समोर) 'डीसीजीआय'ने भारत बायोटेकला (Bharat Biotech) दोन महिन्यांसाठी दर 15 दिवसांनी आणि नंतर पाच महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला योग्य विश्लेषणासह प्रतिकूल घटनांचा डाटा सादर करण्यास सांगितलं आहे. गेल्या आठवड्यात 'डीसीजीआय'च्या तज्ज्ञ पॅनेलने 5 ते 12 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी कॉर्बेवॅक्स या कोविड लसीला आपत्कालीन वापरासाठी अधिकृत मान्यता देण्याची शिफारस केली होती. या घडामोडींशी निगडीत एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, विषय तज्ज्ञ समितीने 'डीसीजीआय'ला या वयोगटासाठी हैदराबाद येथील 'बायोलॉजिकल ई'च्या कार्बेवॅक्सला आपत्कालीन वापरासाठी अधिकृत मान्यता देण्याची शिफारस केली होती. तथापि, आपत्कालीन वापरासाठी ही मान्यता काही अटींच्या अधीन असू शकते, असे देखील सूत्रांनी स्पष्ट केले होते. नुकतीच पॅनेलने 5 ते 12 वयोगटातील मुलांकरिता भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि बायोलॉजिकल ईच्या (Biological E) कॉर्बेवॅक्स लसीच्या प्रतिबंधित आपत्कालीन वापरासाठीच्या शिफारसींवर चर्चा करण्यासाठी एक बैठक घेतली. 'एसईसी'ने 'डीसीजीआय'कडे शिफारशी पाठवल्या आहेत. 'डीसीजीआय'ने शिफारशींना मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याकरिता अंतिम मान्यता देऊ शकते. कॉर्बेवॅक्स ही कोविड-19 विरुद्ध भारतातली पहिली स्वदेशी विकसित प्रोटीन सबयुनिट लस (Protein Subunit vaccine) आहे. ही लस सध्या 12 ते 14 वयोगटातील मुलांना दिली जात आहे.
    First published:

    Tags: Corona vaccine, Vaccination

    पुढील बातम्या