मराठी बातम्या /बातम्या /देश /पातेल्यात बसून नवरा नवरी पोहोचले मंडपात, केरळच्या पावसात एका लग्नाची ‘भन्नाट’ गोष्ट

पातेल्यात बसून नवरा नवरी पोहोचले मंडपात, केरळच्या पावसात एका लग्नाची ‘भन्नाट’ गोष्ट

केरळमध्ये पावसाचं थैमान सुरू असताना लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी (Couple used big vessel to travel through rain water in Kerala) एका जोडप्यानं चक्क पातेल्यात बसून जाण्याचा निर्णय घेतला.

केरळमध्ये पावसाचं थैमान सुरू असताना लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी (Couple used big vessel to travel through rain water in Kerala) एका जोडप्यानं चक्क पातेल्यात बसून जाण्याचा निर्णय घेतला.

केरळमध्ये पावसाचं थैमान सुरू असताना लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी (Couple used big vessel to travel through rain water in Kerala) एका जोडप्यानं चक्क पातेल्यात बसून जाण्याचा निर्णय घेतला.

तिरुवनंतपुरम, 18 ऑक्टोबर : केरळमध्ये पावसाचं थैमान सुरू असताना लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी (Couple used big vessel to travel through rain water in Kerala) एका जोडप्यानं चक्क पातेल्यात बसून जाण्याचा निर्णय घेतला. केरळमध्ये सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच (Heavy rains in Kerala) पाणी झालं आहे. त्यामुळे चालत किंवा कुठल्याही वाहनानं लग्नाच्या ठिकाणी जाणं शक्य नसल्यामुळे या (Unique idea of a couple) जोडप्यानं अनोखी शक्कल लढवत चक्क पातेल्याचा उपयोग केला.

पातेल्यात बसून मंडपात

केरळमध्ये कुट्टनाड भागात राहणाऱ्या राहुल आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाचा मुहूर्त काही आठवड्यांपूर्वीच ठरला होता. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. सर्व पाहुण्यांना आमंत्रणं धाडण्यात आली होती आणि कोरोनाचे नियम पाळत लग्न करण्याचं पूर्ण नियोजन झालं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. अऩेक भागात पूरस्थिती आली आणि रस्ते पाण्याखाली गेले. लग्नाचा दिवस उजाडला तरी पाऊस ओसरण्याचं नाव घेत नव्हता. " isDesktop="true" id="619859" >

काहीही झालं लग्न होणारच

कितीही पाऊस असला तरी ठरल्या वेळी आणि ठरल्या जागीच लग्न करण्याचा निर्धार पती आणि पत्नीनं केला. त्यासाठी त्यांनी एक अनोखी शक्कल लढवली. त्यांनी स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारं एक मोठं पातेलं घेतलं. त्यात दोघंही बसले आणि पुराच्या पातेल्यातून पाणी वल्हवत लग्नमंडपात पोहोचले. त्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा फारच कमी लोक पोहोचले होते. मात्र धो-धो पाऊस कोसळत असल्यामुळं हे अपेक्षितच होतं. वर आणि वधू मंडपात पोहोचले आणि त्यांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या. या अनोख्या लग्नाची चर्चा केरळभर रंगली आहे. नवरा आणि नवरी पातेल्यातून जात असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे वाचा- केरळमध्ये महापुराचा हाहाकार; एका सेकंदात कोसळलं भलमोठं घर, VIDEO VIRAL

केरळमध्ये पावसाचा प्रकोप

केरळमध्ये अद्यापही पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं असून परिस्थिती गंभीर असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Kerala, Marriage, Rain, Wife and husband