• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • केरळमध्ये महापुराचा हाहाकार; एका सेकंदात कोसळलं भलमोठं घर, VIDEO VIRAL

केरळमध्ये महापुराचा हाहाकार; एका सेकंदात कोसळलं भलमोठं घर, VIDEO VIRAL

कोट्टायममधील (Kottayam) मुंडकायममध्ये रविवारी मुसळधार पावसामुळे एक घर (House) पूर्ण वाहून गेलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून तिथली गंभीर परिस्थिती लक्षात येत आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : देशात परतीच्या प्रवासाला लागलेल्या मान्सूननं (Monsoon) अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा (Heavy rain) तडाखा दिला आहे. केरळ, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक राज्यांना अतिदक्षतेचा (Red Alert) इशारा देण्यात आला असून, अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जीवित आणि वित्तहानी झाल्याचं वृत्त आहे. केरळमध्ये (Kerala) सध्या पावसाचा कहर सुरू असून, अग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या केरळवर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, अनेक जणांचा बळी (Death) गेला आहे. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून समोर येणारी विदारक दृश्य सर्वांना हेलावून टाकत आहेत. कोट्टायममधील (Kottayam) मुंडकायममध्ये रविवारी मुसळधार पावसामुळे एक घर (House) पूर्ण वाहून गेलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून तिथली गंभीर परिस्थिती लक्षात येत आहे. केरळमध्ये शनिवारपासून सुरू असललेल्या मुसळधार पावसाने पूर आणि भूस्खलनामुळे (Land Slide) किमान 24 जणांचा मृत्यू झाला आहे. कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यातील डोंगराळ भागात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही लोकांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत नऊ मृतदेह सापडले आहेत. दोन लोक बेपत्ता आहेत, अशी माहिती इडुक्कीच्या जिल्हा दंडाधिकारी शीबा जॉर्ज यांनी दिली. कोट्टायम जिल्ह्यातील कुट्टिक्कल इथं भूस्खलनामुळे एक घर कोसळलं. त्यात या घरातील सहा जणांचा मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी काल तिघांचे मृतदेह बाहेर काढले, तर उर्वरित मृतदेह आज बचाव पथकाने काढले. मृतांमध्ये या कुटुंबातील 40 वर्षीय प्रमुख, त्याची 75 वर्षीय आई, 35 वर्षीय पत्नी आणि 14, 12 आणि 10 वर्षे वयाच्या तीन मुलींचा समावेश आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी लष्कराच्या तुकड्या (Military) इथे पोहोचल्या असून, कोट्टायममध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी काम सुरू केलं आहे. पांगोडे मिलिटरी स्टेशनच्या मद्रास रेजिमेंटने कुटिकलपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कवली गावात बचावकार्य सुरू केलं असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितलं. दरम्यान, रविवारी पाऊस कमी झाला असला, तरी भारतीय हवामान विभागाने (IMD)11 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन (CM Pinardi Vijayan) यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आणि सर्वप्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं.

काश्मीर : अज्ञात हल्लेखोरांचा बिहारी कामगारांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू

'प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करत आहे, असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. 'केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे काही लोकांचा मृत्यू झाला आहे, ही अत्यंत दुःखाची बाब आहे. शोकग्रस्त कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे.' असंही त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनीही केरळमधील अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित लोकांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली असून, केरळच्या काही भागांतील गंभीर परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे. बचावकार्यात मदत करण्यासाठी एनडीआरएफची टीम आधीच पाठवण्यात आली आहे. सर्वांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो,' असं ट्विटरवर म्हटलं आहे. केरळचे महसूलमंत्री के. राजन यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, कोक्कयार आणि कुटिकलला भेट देणारे विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीसन यांनी राज्य सरकार प्रभावित भागात वेळेत बचाव कार्य सुरू करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.
First published: