मराठी बातम्या /बातम्या /देश /

ज्या मुलासाठी 15 लाखाची FD केली त्याचा कोरोनाने जीव घेतला, त्या पैशातून दाम्पत्य वाचवतंय गरजूंचे प्राण

ज्या मुलासाठी 15 लाखाची FD केली त्याचा कोरोनाने जीव घेतला, त्या पैशातून दाम्पत्य वाचवतंय गरजूंचे प्राण

मुलगा गेल्यानंतर ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी हा पैसा खर्च करावा याची आम्हाला जाणीव झाली. त्यामुळं शक्य ती मदत लोकांना करणार असल्याचं मेहता म्हणाले.

मुलगा गेल्यानंतर ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी हा पैसा खर्च करावा याची आम्हाला जाणीव झाली. त्यामुळं शक्य ती मदत लोकांना करणार असल्याचं मेहता म्हणाले.

मुलगा गेल्यानंतर ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी हा पैसा खर्च करावा याची आम्हाला जाणीव झाली. त्यामुळं शक्य ती मदत लोकांना करणार असल्याचं मेहता म्हणाले.

  • Published by:  News18 Desk

अहमदाबाद, 25 एप्रिल : कोरोनाच्या या संकटाकाळामध्ये (Coronavirus Pandemic) अनेक लोकांना आपले जवळचे लोक गमावल्याचं दुखः झालं आहे. विशेषतः ज्या कुटुंबांनी त्यांचे तरुण मुलं मुली गमावले आहेत, त्यांच्यावरचं संकट तर अधिकच मोठं आहे. कारण आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात आपल्याला सांभाळणारं कोणीच नाही, या दुःखाला आता त्यांना उर्वरित आयुष्य सामोरं जावं लागणार आहे. पण सूरतच्या एका दाम्पत्यानं हे दुःख जगत बसण्यापेक्षा इतरांना मदत करत जीवन जगायला सुरुवात केली आहे. ज्या मुलासाठी पैसा जमवला तोच राहिला नाही म्हणून त्यांनी तो पैसा आता गरजुंसाठी खर्च करायला सुरुवात केली आहे.

रसिक मेहता आणि कल्पना मेहता असं या गुजरातच्या अहमदाबादमधील दाम्पत्याचं नाव आहे. रसिक आणि कल्पना या सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात गरजुंना आवश्यकत ती सर्व मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांची मदत करण्यामागं त्याचं एक अत्यंच भावनिक असं कारण आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्या वर्षी त्यांच्या एकुलत्या एक मुलानं प्राण गमावले. ज्या मुलासाठी त्यांनी अनेक स्वप्ने पाहिली तोच कोरोनानं त्यांच्यापासून हिरावून नेला. या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मेहता दामप्त्याने 15 लाख रुपयांची एफडी केली होती. पण तरणाताठा मुलगा राहिला नाही, मग पैशाचं काय करणार. त्यामुळं त्यांनी इतर कुटुंबावर ही वेळ येऊ नये म्हणून हे 15 लाख रुपये कोरोनाच्या रुग्णांवर खर्च करण्याचा निर्णय घेतला.

(वाचा-'या' गावात आतापर्यंत एकही Corona Positive नाही; गावकऱ्यांनीच सांगितलं मोठं गुपित)

यानंतर रसिक मेहता आणि त्यांच्या पत्नी कल्पना यांनी कोरोना रुग्णांवर वेळेत आणि चांगले उपचार व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले. आतापर्यंत त्यांनी 200 पेक्षा अधिक रुग्णांना आयसोलेशनमध्ये किट आणि इतर साहित्य वाटप केलं आहे. कोरोनापासून प्रतिबंध व्हावा म्हणून त्यांनी 350 पेक्षा अधिक लोकांना त्यांच्या खर्चानं लसीकरणही केलं आहे. दैनिक भास्करनं हे वृत्त दिलं आहे.

(वाचा-मालकाच्या परवानगी शिवाय 43 कोटींच्या बंगल्यात लग्नाचं आयोजन; पोलीस आले आणि...)

मेहता दाम्पत्य रोज सकाळी अशा लोकांचा शोध घेतात ज्यांना खरंच कोरोना काळात उपचारांसाठी मदतीची गरज आहे. ज्यांनी अद्याप लसीकरण केलं नसेल त्यांना ते स्वतःच्या कारमध्येच लसीकरणासाठी घेऊन जातात. त्यांनी त्यांची स्वतःची एख गाडीदेखिल अॅम्ब्युलन्स म्हणून कोरोना रुग्णांसाठी दिली आहे. मुलगा गेल्यानंतर ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी हा पैसा खर्च करावा याची आम्हाला जाणीव झाली. त्यामुळं शक्य ती मदत लोकांना करणार असल्याचं मेहता म्हणाले.

First published:

Tags: Ahmedabad, Coronavirus