झारखंड, 25 एप्रिल: झारखंडमधील पूर्व सिंहभूमच्या घाटशिला उपविभागात एक गाव आहे. या गावातील कोणत्याही व्यक्तीला अद्याप कोरोना (Corona) झालेला नाही. ढेकीत कुटलेला लाल तांदूळ
(Red Rice) खाल्ल्याचा हा परिणाम असल्याचं येथील ग्रामस्थ मानतात. लाल तांदुळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती
(Immunal Power) वाढते. त्यामुळे त्यांचे आरोग्य देखील चांगले राहते, असा येथील ग्रामीण भागातील लोकांचा दावा आहे. घाटशिला उपविभागातील डुमरिया ब्लॉकमधील बकुळचंदा
(Bakulchanda) या दुर्गम आणि डोंगराळ भागातील प्रत्येक घरात तुम्हाला तांदूळ कुटून त्याचा लगदा तयार करणारे यंत्र दिसेल. आजही या गावात ढेकी या पारंपारिक यंत्रात तांदुळ कुटून खाल्ला जातो. या उन्हाळ्याच्या दिवसात लाल तांदळाचा तिखट भात सेवन करुन आम्ही निरोगी राहतो, असे येथील ग्रामस्थ सांगतात.
या गावातील ग्रामस्थांनी सांगितले, की भात शेतीसाठी आम्ही शेण खताचा वापर प्रामुख्याने करतो. लाल तांदुळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आमच्या भागात लोकं आजारी पडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सगळीकडे कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत, मात्र या गावात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. बकुळचंद गावातील ढेकी यंत्रात कुटलेले लाल तांदुळ सर्वदूर प्रसिध्द आहेत. या गावातील लोक ढेकीचा वापर करुन तांदुळ आणि चारा कुटतात आणि त्याची विक्री करतात. बकुळचंदच्या आसपास गावातील लोकं देखील येथूनच तांदुळ खरेदी करतात. आजच्या जमान्यात तांदुळ कुटणारे ढेकी यंत्र पाहायला मिळणे तसे दुर्मिळच. परंतु, या गावातील प्रत्येक घरात हे यंत्र पाहायला मिळते.
हे ही वाचा-
देशभरात Oxygen Supply चा तुटवडा; या तीन दुर्घटना अंगावर काटा आणतील!
असा तयार होतो लाल तांदुळ
जमाना बदलल्यानं ढेकीत कुटलेले तांदुळ सर्वत्र मिळत नाहीत. लोक आता भरडाई केंद्रातील तांदळाचे सेवन करतात. लाल तांदळाविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. हळूहळू आता ढेकीचे तांदुळ लुप्त होत आहेत. सरकारकडून रेशनवर तांदूळ मिळत असल्याने अनेकांनी आता ढेकीत कुटून तांदुळ बनवणं बंद केलं आहे. अत्यंत दुर्गम अशा ग्रामीण भागातील (Rural Area) एखाद्या गावात तांदुळ कुटून देणारे आणि लाकडापासून तयार केले जाणारे ढेकी यंत्र पाहायला मिळते. ही मशीन लाकडापासून बनवली जाते. या यंत्रावर तांदुळ कुटतेवेळी दोन लोकांची गरज भासते. हे दोन लोक सातत्यानं आपल्या पायानं हे यंत्र चालवत असतात. या यंत्रातून बाहेर पडणारे तांदूळ जमिनीतील खड्डयात साठतात. या खड्डयात ढेकी यंत्रावर सुड्या आपटून तांदूळ तयार केला जातो.
याबाबत येथील ग्रामस्थ संध्याराणी सरदार आणि भक्ती नायक यांनी सांगितले की प्रथम धान (Rice) सुकवले जाते. त्यानंतर ते गरम पाण्यात उकळून ते पुन्हा सुकवले जाते आणि त्यानंतर तांदूळ तयार होतो. ढेकीत तांदुळ तयार करताना त्यातील पौष्टीक मूल्य नष्ट होत नाही. अत्याधुनिक मशीनव्दारे बनवलेल्या तांदळाच्या तुलनेत हे तांदूळ आधिक पौष्टीक असतात. बकुळचंदा गावात दूरवरुन लोक लाल तांदुळ खरेदीसाठी येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.