मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मालकाच्या परवानगी शिवाय 43 कोटींच्या बंगल्यात केलं लग्नाचं आयोजन; पोलीस पोहोचताच भलताच प्रकार उघड

मालकाच्या परवानगी शिवाय 43 कोटींच्या बंगल्यात केलं लग्नाचं आयोजन; पोलीस पोहोचताच भलताच प्रकार उघड

हे दांपत्य दुसऱ्याच्या घराला आपले ड्रिम होम मानू लागले. विशेष म्हणजे या दांपत्याने हे घर भाडे तत्वावरही घेतले नव्हते.

हे दांपत्य दुसऱ्याच्या घराला आपले ड्रिम होम मानू लागले. विशेष म्हणजे या दांपत्याने हे घर भाडे तत्वावरही घेतले नव्हते.

हे दांपत्य दुसऱ्याच्या घराला आपले ड्रिम होम मानू लागले. विशेष म्हणजे या दांपत्याने हे घर भाडे तत्वावरही घेतले नव्हते.

    अमेरिका, 25 एप्रिल : विवाह सोहळा (Wedding ceremony) संस्मरणीय व्हावा, अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. यासाठी अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी विवाहादरम्यान केल्या जातात. गेल्या काही काळात असेच काही अनोखे विवाह सोहळे वेगळ्या आणि वैशिष्ठपूर्ण आयोजनाने विशेष चर्चेले गेले. सोशल मीडियावरही (Social Media) या विवाह सोहळ्यांच्या अनुषंगाने नेटिझन्सकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडला. समुद्राखाली, विमानात, एअरबलूनमध्ये तसेच शाही पध्दतीचे विवाह सोहळे अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. याचे व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल देखील झाले. परंतु अमेरिकेत (America)नुकताच एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. याचे आयोजन थोडेसे विचित्र पध्दतीने झाले. परिणामी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि हा सोहळा थांबवावा लागला. दांपत्याकडून होणारी फसवेगिरी वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.

    दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील फ्लोरिडामधील (Florida)एका दाम्पत्याने विक्रीसाठी असलेल्या 43 कोटींच्या बंगल्यात (Bungalow) विवाहाचे आयोजन केले. नवरा मुलगा हा बंगला पाहण्याच्या निमित्ताने अनेकवेळा तेथे गेला आणि त्यानी त्या बंगल्याचे फोटो काढले. ज्यांचा विवाह या बंगल्यात होणार होता, त्या वधूचे नाव शोनिता जोन्स तर वराचे नाव कोर्टनी विल्सन आहे. हे दांपत्य दुसऱ्याच्या घराला आपले ड्रिम होम मानू लागले. इतकेच नाही तर लग्नपत्रिकेवर त्यांनी विवाहस्थळ म्हणून या घराचा उल्लेख विल्सन स्टेट (Wilson State)असा केला. विशेष म्हणजे या दांपत्याने हे घर भाडे तत्वावरही घेतलेले नाही. तरी देखील असा उल्लेख करण्याचे धाडस त्यांनी केले.

    हे वाचा-Amazing! घरात शिरलेल्या सापाची तहान भागवली, सर्पमित्राने पाजलं पाणी

    या बंगल्यापासून जवळच राहणाऱ्या त्याच्या मालकाने जेव्हा बंगल्यात विवाहाचा सेटअप लावलेला पाहिला तेव्हा त्याने पोलिसांना बोलावले. यावेळी पोलिसांनी हा विवाहसोहळा रोखला परंतु कोणालाही अटक केली नाही. या अलिशान बंगल्याच्या मालकाने पोलिसांना सांगितले की विल्सनचं म्हणणं होतं की मी येथे विवाह करावा,हा एक ईश्वरीय संदेश आहे. या बंगल्याचा मालक जवळपासच राहतो हे या दांपत्याला बिल्कुल माहिती नव्हते. पोलीस आल्यानंतर बंगला सोडण्यापूर्वी विल्सन म्हणाला, की याबाबत आता मी काही बोलू इच्छित नाही.

    असा आहे बंगला

    9 बेडरुम्स असलेल्या या बंगल्यात एक भव्य बार रुम,टू स्टोरी बार,चित्रपटगृह,जलतरण तलाव,टेनिस कोर्ट आणि डान्स स्टुडीओ देखील आहे. यावेळी विल्सन याने शालेय जीवनाच्या 30 वर्षांनंतर तो कसा त्याच्या गर्लफ्रेंडला पुन्हा भेटला,ख्रिसमसच्या निमित्ताने त्याने तिला कसे प्रपोज केले हे यावेळी सांगितले.

    First published:

    Tags: United States of America