नवी दिल्ली, 15 डिसेंबर: लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी (Second day of marriage) हनीमूनला (Honeymoon) जाण्याऐवजी एका जोडप्याने (Couple) थेट दफनभूमीत (Crematory) जाण्याचा निर्णय घेतला. भारतातील कुठल्याही कुटुंबासाठी लग्न हा मोठा सोहळा असतो. लग्नासाठी अनेक महिन्यांपासून तयारी केली जाते आणि लग्न झाल्यानंतर जोडपी एकमेकांसोबत हनीमूनला जातात. लग्नानंतरचा वेळ एकत्र घालवता यावा आणि एकमेकांच्या स्वभावाची जवळून ओळख व्हावी, यासाठी दोघंही प्रयत्नशील असतात. कुठल्याही लग्नात नवरा आणि बायको यांच्याशिवाय दोन्हीकडील मंडळीदेखील गुंतलेली असतात आणि लग्न ठरल्यापासून ते होईपर्यंतचा काळ गडबड आणि धावपळीचा असतो. मात्र काही जोडपी अशी असतात जी या धावपळीतही सामाजिक भान जपतात आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगीदेखील समाजासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. याची प्रचिती नुकत्याच एका जोडप्यानं दिली आहे. घेतला अनोखा निर्णय मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद ओसमान नावाच्या तरुणाचं नूर अफिफा हबीब नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं. मोहम्मद हा एका सामाजिक संस्थेत काम करत होता आणि गेल्या काही महिन्यांपासून कोरोना योद्धा म्हणून मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पार पाडत होता. कोरोनामुळे ज्यांचे मृत्यू झाले आहेत, त्यांना दफनभूमीत घेऊन जाणं आणि त्यांच्या अंत्यसंस्काराची सोय लावून देण्याचं तो या संस्थेसोबत करत होता. लग्नाच्या दिवशीदेखील त्याला काहीजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समजलं. एकीकडे त्याचं लग्न झालं होतं आणि दुसरीकडे ही बातमी आल्यामुळे त्याला अंत्यसंस्कारासाठी जाण्याची इच्छा होती. त्याने याबाबत आपल्या पत्नीशी चर्चा केली आणि दोघांनीही हनीमून पोस्टपोन करून कोरोना वॉरियरचं काम करण्याचा निर्णय घेतला. हे वाचा -
केले 15 जणांचे अंत्यसंस्कार लग्न झाल्यानंतर या जोडप्यानं 15 जणांवर अंत्यसंस्कार केले आहेत. या जोडप्यानं आपलं वैयक्तिक आयुष्य आणि त्यातील आनंद या गोष्टी पुढे ढकलत अगोदर आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचंं समाजात सर्वदूर स्वागत होत असून या जोडप्यानं समाजापुढे एक वेगळा आदर्श आपल्या कृतीतून ठेवल्याचे गौरवोद्गार अनेकजण काढत आहेत.

)







