नवी दिल्ली, 15 डिसेंबर : महात्मा गांधी यांनी (Mahatma Gandhi) आपल्या भाषणात एकदा नाही तर अनेकदा सांगितलंय की त्यांच्या मते हिंदू (Hindu) धर्माचा अर्थ काय आहे किंवा कोणत्या व्यक्तीला हिंदू म्हणता येईल. आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात गांधीजी आपला हिंदू धर्मावर विश्वास असल्याचे सांगण्यापासून कधीही मागे हटले नाही. ते स्वतःला चांगले हिंदू समजत होते. या गोष्टी त्यांनी वेळोवेळी त्यांच्या लेखांतूनही लिहिल्या आहेत.
गांधीजींचा नेहमीच उपासना आणि प्रार्थनेवर विश्वास होता. आपण आपले जीवन कसे जगावे हे देखील ते आपल्या अनुयायांना सांगत असत. मात्र, हिंदू असूनही ते इतर धर्माच्या लोकांसाठी प्रिय राहिले आणि प्रत्येक धर्माचा धार्मिकदृष्ट्या आदर केला हे गांधीजींचे वैशिष्ट्य होते.
हिंदू धर्म म्हणजे काय?
'गांधी वांगमय'च्या खंड 23 च्या पृष्ठ 516 मध्ये त्यांनी हिंदू धर्म म्हणजे काय आणि कोण स्वतःला हिंदू म्हणवू शकतो हे स्पष्ट केलं. ते म्हणतात, की “जर मला हिंदू धर्माचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले गेले तर मी एवढेच म्हणेन – अहिंसक मार्गाने सत्याचा शोध. देवावर विश्वास नसला तरी माणूस स्वतःला हिंदू म्हणवू शकतो.
गांधींच्या मते, "हिंदू धर्म हे सत्याच्या अथक शोधाचे दुसरे नाव आहे. हिंदू धर्म हा सर्वात सहिष्णू धर्म आहे. तर वांगमय 28 मध्ये, पृष्ठ 204 वर स्पष्ट केलं, की "हिंदू धर्मात प्रत्येक धर्माचे सार आहे, जे यात नाही, ते निरर्थक आणि अनावश्यक आहे".
तर मी हिंदू धर्म सोडेन
गांधीजींनी 20 ऑक्टोबर 1927 रोजी 'यंग इंडिया'मध्ये एक लेख लिहिला होता "मी हिंदू का आहे". त्यात त्यांनी लिहिले आहे की, "माझा जन्म हिंदू कुटुंबात झाला, त्यामुळे मी हिंदू आहे. जर मला ते माझ्या नैतिक भावनेच्या किंवा आध्यात्मिक विकासाच्या विरुद्ध वाटले तर मी हिंदू धर्माचा त्याग करेल."
“मी अभ्यास केलेल्या धर्मांपैकी मला तो सर्वात सहिष्णू असल्याचे आढळले आहे. यात सैद्धांतिक कट्टरता नाही, ही गोष्ट मला खूप आकर्षित करते. हिंदू धर्म निषिद्ध नाही, म्हणून त्याचे अनुयायी केवळ इतर धर्मांचा आदरच नाही तर ते सर्व धर्मातील चांगल्या गोष्टी स्वीकारू शकतात.
माझा पुनर्जन्म आणि अवतारांवर विश्वास
त्यांनी "यंग इंडिया"च्या 6 ऑक्टोबर 1921 च्या अंकात लिहिले, "मी स्वतःला सनातनी हिंदू म्हणवतो कारण मी वेद, उपनिषद, पुराणे आणि हिंदू धर्मग्रंथ म्हणून ओळखल्या जाणार्या सर्व साहित्यावर आणि म्हणूनच अवतार आणि पुनर्जन्मांवर विश्वास ठेवतो." मी गोरक्षणावर त्याच्या लोकप्रिय स्वरूपांपेक्षा अधिक व्यापक अर्थाने विश्वास ठेवतो. प्रत्येक हिंदू देवावर आणि त्याच्या विशिष्टतेवर विश्वास ठेवतो, पुनर्जन्म आणि मोक्षावर विश्वास ठेवतो. गांधीजींचाही मूर्तीपूजेवर विश्वास होता, त्यांनी याच लेखात माझा मूर्तीपूजेवर विश्वास असल्याचे लिहिले आहे.
जेव्हा हिंदू धर्मावर संकट आले...
7 फेब्रुवारी 1926 च्या ‘नवजीवन’च्या अंकात गांधीजींनी लिहिले होते, ‘जेव्हा जेव्हा या धर्मावर संकटं आली, तेव्हा तेव्हा हिंदू धर्माच्या अनुयायांनी तपश्चर्या केली आहे. या संकटाची कारणे शोधली आणि त्यांचे निदान केलं. त्यांचे शास्त्र वाढत गेले. वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे आणि इतिहास आदी गोष्टी एकाच वेळी निर्माण झालेले नाहीत. तर प्रसंग आल्यावर वेगवेगळे ग्रंथ निर्माण झाले आहेत. त्यामुळेच त्यांच्यात परस्परविरोधी गोष्टी देखील पाहायला मिळतील.
हिंदू धर्मातील सर्वात मोठा दोष
गांधींनी अस्पृश्यता ही हिंदू धर्मातील सर्वात मोठी त्रुटी मानली. त्यांनी "तरुण भारत" या त्यांच्या एका लेखात लिहिले आहे, की "मी अस्पृश्यता हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा दोष मानत आलो आहे. हे खरं आहे, की हा दोष आपल्या परंपरेतून चालतोय. हेच इतर अनेक वाईट प्रथांनाही लागू होते. मुलींना वेश्याव्यवसायासाठी अर्पित करणे हा हिंदू धर्माचा एक भाग होता, याची मला लाज वाटते.”
बोकडाचा बळी
“कालीला बकरी अर्पण करणे मी अधर्म मानतो आणि तो हिंदू धर्माचा भाग मानत नाही. एकेकाळी धर्माच्या नावाखाली पशूबलिदान केले जायचे यात शंका नाही, पण तो धर्म नाही आणि तो हिंदू धर्मही नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hindu, Mahatma gandhi, Pm modi, Rahul gandhi