Home /News /national /

2 States In Lockdown : नवरदेवाला दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी पोलिसांनी अडवलं, लग्नासाठी असा काढला मार्ग

2 States In Lockdown : नवरदेवाला दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी पोलिसांनी अडवलं, लग्नासाठी असा काढला मार्ग

नवरी एका राज्यात तर नवरा दुसऱ्या राज्यात, नवरदेवाला पोलिसांनी अडवल्यावर ठरलेल्या दिवशीच लग्न करण्यासाठी असा काढला मार्ग

    लखनऊ, 21 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे यंदाच्या लग्नसराईवर परिणाम झाला आहे. आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याची परवानगी नवरदेव आणि नवरीला मिळाली नाही. अशा परिस्थितीत दोघांनी त्यांच्या त्यांच्या राज्यांच्या सीमेवर थांबून लग्न केलं. उत्तराखंडमधील टिहरीतील कोठी कॉलनीत राहणाऱ्या मोहम्मद फैजलचा विवाह उत्तर प्रदेशातील बिझनौर मधील आयेशासोबत ठरला होता. दोघांचे लग्न बुधवारी निश्चित कऱण्यात आले होते. मात्र लॉकड़ाऊनमुळे लग्न कसे होणार या चिंतेत दोन्ही कुटुंबिय होती. आयेशाच्या कुटुंबियांनी सांगितलं की, बुधवारी नवऱ्याकडचे लोक येणार होते. पण लॉकडाऊन असल्यानं त्यांना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी मिळाली नाही. पण दोन्हीकडच्या मंडळींनी ठरलेल्या दिवशीच लग्न करण्याचं ठरवलं होतं. यासाठी त्यांनी दोन्ही राज्यांच्या सीमेवर लग्न करण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी घेतली. प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर दोन्ही राज्यांच्या सीमेवरच लग्न लावण्यात आलं. यावेळी दोन्ही राज्यांमधील पोलीसही उपस्थित होते. हे वाचा : एका रात्रीत बनला करोडपती, मिळालेल्या पैशांचा वापर 'या' चांगल्या कामासाठी करणार भारतात गुरुवारी सकाळपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 1,12,359 झाली आहे. गेल्या 24 तासात 5609 नवे रुग्ण आढळले असून 132 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशात 3435 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा : लॉकडाऊनमुळे हरवलेले पिता सापडले, 3 वर्षांपूर्वी पडले होते घराबाहेर
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Lockdown

    पुढील बातम्या