देशहित प्रथम! टिकटॉकसाठी कोर्टात बाजू मांडणार नाही; मुकुल रोहतगींचा निश्चय

देशहित प्रथम! टिकटॉकसाठी कोर्टात बाजू मांडणार नाही; मुकुल रोहतगींचा निश्चय

केंद्र सरकारने बंदीचा आदेश काढल्यानंतर टिकटॉक, हॅलोहस चीनचे 59 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. वापरकर्त्यांच्या सुरक्षेचं कारण पुढे करीत हे अ‍ॅप्स बंद करण्यात आले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 जुलै : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील 59 अ‍ॅप्सवर बंदी आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर चिनी अ‍ॅप्स यांनी कोर्टात धाव घेतली आहे. मात्र या प्रकरणात देशाविरोधात याचिका दाखल झाल्यास बाजू मांडणार नाही, असं वक्तव्य देशाचे माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी केलं आहे. टिकटॉकची बाजू मांडण्यासाठी रोहतगी यांनी नकार दिला आहे.

केंद्र सरकारने बंदीचा आदेश काढल्यानंतर टिकटॉक, हॅलोहस चीनचे 59 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. वापरकर्त्यांच्या सुरक्षेचं कारण पुढे करीत हे अ‍ॅप्स बंद करण्यात आले आहे. बंदीच्या निर्णयानंतर टिकटॉकने याबाबत स्पष्टीकरण दिलं असून यामध्ये वापरकर्त्यांचा डेटा चीनला दिला जात नसल्याचे सांगितले आहे. टिकटॉकचे भारताचे प्रमुख निखिल गांधी यांनी यावर स्वाक्षरी केली आहे.

हे वाचा-टिकटॉकवर बंदी! सरकारच्या निर्णयाविरोधात या महिला खासदाराने केला सवाल

टिकटॉकवरील बंदीनंतर अनेक तरुणांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात नापसंती व्यक्त केली होती. भारत-चीन सीमा विवादादरम्यान भारत सरकारने डेटा सुरक्षेचा हवाला देत चीनला मोठा धक्का दिला आहे आणि 59 चिनी अ‍ॅप्सवर  (TikTok Ban in India)  बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या अ‍ॅप्समध्ये टिकटॉक, स्नॅपचॅट आणि हॅलो यासारख्या अनेक प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे.

हे वाचा-चीनचा माजोरडेपणा सुरूच, भारताशी चर्चा सुरू असतानाच तैनात केले 20 हजार जवान

दरम्यान चीनचं ट्विटर समजल्या जाणाऱ्या Weiboवर पंतप्रधान मोदींचं अकाउंट होतं. आता हे अकाउंट सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून त्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. त्याच बरोबर आत्तापर्यंतचे बहुतांश ट्विट्स डिलिटही (Delete) केले आहेत. Weiboवरही पंतप्रधानांच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे.

 

संपादन - मीनल गांगुर्डे

 

First published: July 1, 2020, 6:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading