चीनचा माजोरडेपणा सुरूच, भारताशी चर्चा सुरू असतानाच सीमेवर तैनात केले 20 हजार जवान

चीनचा माजोरडेपणा सुरूच, भारताशी चर्चा सुरू असतानाच सीमेवर तैनात केले 20 हजार जवान

भारतानेही जोरदार तयारी केली आहे. पूर्व लडाखमध्ये सैन्याच्या दोन डिव्हिजन तैनात केल्या आहेत. हवाई दलाने युद्धसरावही सुरू केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 30 जून: भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला सीमा वाद ( India China Border Dispute) शांत होण्याची शक्यता दिसत नाही. दोन्ही देशांची सीमा वादावर बोलणी सुरू असतानाच चीनने सीमेवर तब्बल 20 हजार सैनिक (China Army) तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे सैनिक सीमेजवळच्या तळांवर असून कमीत कमी वेळात प्रत्यक्ष LAC जवळ जाता येईल अशा परिस्थितीत ते आहेत अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. भारताचीही चीनच्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर असून लष्करानेही सगळी तयारी केली आहे.

वास्तविक नियंत्रण रेषेवरील चिनी आक्रमणामुळे पूर्व लडाखमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे शुक्रवारी लेह येथे भेट देणार आहेत.

लडाख जवळच्या जिनजियांग प्रांतातही चीनने 10 हजार सैनिक आणून ठेवले आहेत. 48 तासांमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचता येईल अशी चीनची तयारी आहे. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. सीमेवर शांतता राहावी असं दोन्ही बाजूंकडून ठरलेलं आहे. मात्र ठरलेलं असतानाही चीनचा मुजोरपणा सुरूच असून सीमेवर सैन्याची जमवाजमव करून चीन दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जातं आहे.

भारतानेही जोरदार तयारी केली आहे. पूर्व लडाखमध्ये सैन्याच्या दोन डिव्हिजन तैनात केल्या आहेत. तर वायुसेनेच्या मदतीने रणगाडे आणि इतर साधन सामुग्रीही पोहोचविण्यात आली आहे. तसच वायुसेनेने युद्ध सराव सुद्धा सुरू केला आहे.

हे वाचा -  भारताविरोधी चिनी पत्रकाराच्या वक्तव्यावर आनंद महिंद्रांनी दिलं चोख प्रत्युत्तर

भारत आणि चीन यांच्यात 15 ते 16 जून दरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये कमांडर स्तरावर (Corps Commander Level) चर्चा झाली. मात्र या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये याआधीही चर्चा झाली होती. त्यावेळी चीनने या चर्चेनंतर गलवान खोऱ्या जवळील LAC मधील काही भागांतून आपले सैन्य मागे घेण्याचे मान्य केले आहे, परंतु अद्याप पॅंगोंग लेक चीनने चर्चा केली नाही आहे.

हे वाचा - गलवान खोऱ्यात किती चिनी सैनिकांचा झाला मृत्यू? सरकार गप्प; कुटुंबीय संतापले

दोन्ही देशांमधील बर्‍याच मुद्द्यांवर एकमत होत नाही आहे. गलवान खोऱ्यातून माघार घेण्यासाठी निश्चित केलेल्या पॅरामीटर्सशी चीन जवळजवळ करार करीत आहे, पण दोन्ही देश पॅंगोंग लेक जवळील सैन्य मागे घेण्यास तयार नाही आहेत. भारतीय सेना फिंगर -4 मध्ये आहे, आणि हा परिसर नेहमीच भारताच्या अखत्यारीत राहिला आहे. तर, भारतानं फिंगर -8 वर भारताने LAC असल्याचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी चुशुल येथे भारत आणि चीनी सैन्य दलात झालेल्या कॉर्पोरेशन कमांडर-स्तरावरील बैठकीतही यावर तोडगा निघाला नाही.

संपादन - अजय कौटिकवार

 

First published: July 1, 2020, 5:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading