मुंबई, 1 जुलै : भारत-चीन सीमा विवादादरम्यान भारत सरकारने डेटा सुरक्षेचा हवाला देत चीनला मोठा धक्का दिला आहे आणि 59 चिनी अॅप्सवर (TikTok Ban in India) बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या अॅप्समध्ये टिकटॉक, स्नॅपचॅट आणि हॅलो यासारख्या अनेक प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे.
भारत सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असताना टीएमसीच्या खासदार आणि बंगाली सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहां यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. कोलकाता येथे इस्कॉनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नुसरत जहां गेल्या होत्या. तेथे त्यांनी टिकटॉक बंदीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.
हे वाचा-चिनी अॅप्सवरील बंदीनंतर नितीन गडकरींचा चीनला झटका; केली मोठी घोषणा
नुसरत जहां यांनी भारत सरकारच्या टिकटॉक बंदीच्या निर्णयाला 'घाईत घेतलेला निर्णय' म्हटले आहे. त्या म्हणाल्या 'टिकटॉक माझ्यासाठी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसारखे आहे. माझा प्रश्न असा आहे की, आपण अचानक हा निर्णय घेतल्यास काय होईल? फक्त अॅप बंद केल्याने काय होईल? इतकेच नव्हे तर अॅपवर बंदी घालण्याची तुलना अभिनेत्रीने नोटाबंदीशी केली आणि सांगितले की सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तरुण नोकर्या गमावतील.
हे वाचा-चीनला चहुबाजूने वेढलं! आता ऑस्ट्रेलियन सैन्यानेही केला घेराव सुरू
त्या म्हणाल्या की, सरकारच्या या निर्णयानंतर बर्याच लोकांना नोकर्या गमवाव्या लागतील. त्यांचे काय होईल? देशाच्या सुरक्षेच्या हितासाठी मी सरकारसमवेत आहे, परंतु सैन्यासाठी वापरण्यात येणार्या बुलेट प्रूफ जॅकेट्स चीनकडून आल्या जातात. झोपून उठून नोटबंदी केली. अचानक अॅप बंद केले. यामुळे काय होईल? याचे उत्तर कोण देईल? आम्हाला सध्या महागाई नको आहे. टिकटॉकवर नुसरत बऱ्याच सक्रिय होत्या. सातत्याने त्या टीकटॉकवर आपले व्हिडीओ पोस्ट करत असे आणि त्यांचे फॉलोअर्सही मोठ्या संख्येने होते.
संपादन - मीनल गांगुर्डे