आग्रा, 4 नोव्हेंबर: यंदाच्या दिवाळीतील सर्वात (Costliest sweet dish in India so far) महागडी मिठाई घेण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. हजारो रुपये प्रतिकिलो या दरानं ही मिठाई (Thousands of Rupees per KG) विकली जात आहे. हे वाचून तुम्हाला प्रश्न पडले की या मिठाईला सोनं लागलंय की काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, होय. या मिठाईला सोनं (Gold in the sweet) लागलं आहे. म्हणजेच सोन्याचा वापर करून ही मिठाई तयार करण्यात आली आहे.
अनोखं आकर्षण
उत्तर प्रदेशमधील आग्रा शहरात ही मिठाई विकली जात आहे. सोन्याच्या वर्ख असलेल्या या मिठाईची किंमत आहे 30 हजार रुपये प्रतिकिलो. एवढी महागडी मिठाई असूनदेखील ग्राहक मात्र ती खरेदी करण्यापासून मागे हटत नाहीत. या मिठाईचा दर ऐकूनदेखील ती घेणारे अनेक ग्राहक सध्या आग्र्यात आहेत.
अशी सुचली कल्पना
आपल्या दुकानात येणारे ग्राहक दर वेळी नवं काय बनवलं आहे, असं विचारत असल्याचा अनुभव ही मिठाई बनवणाऱ्या हलवायांनी सांगितला आहे. यंदा आम्ही सोन्याचा वापर करून मिठाई तयार करण्याचं ठरवलं. ही मिठाई खास दिवाळीसाठी तयार करण्यात आली. जेव्हा ही मिठाई तयार होऊन दुकानात आली, तेव्हा त्याचा भाव ऐकून लोक काय प्रतिसाद देतील, याची आपल्याला कल्पना नव्हती. इतकी महाग मिठाई लोक खरेदी करणार नाहीत किंवा अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक ही मिठाई घेऊन जातील, असं वाटल्याचं दुकानदार सांगतात. प्रत्यक्षात मात्र घडलं वेगळंच. ही मिठाई ग्राहकांना इतकी आवडली की दिवाळीसाठी हजारो रुपये खर्च करून त्यांनी ही मिठाई घेण्याचा निर्णय घेतला.
हे वाचा-फटाक्यांनी अंग भाजल्यास असे करा सोपे उपाय; डॉक्टरांनी सांगितल्या या टिप्स
सोनं आरोग्यासाठी चांगलं
सोनं हा धातू दागिन्यांसाठी लोकप्रिय तर आहेच, मात्र आपल्या शरीरासााठीदेखील सोनं चांगलं असल्याचं सांगितलं जातं. अनेक पदार्थांमध्ये सोनं आणि चांदीचा अंश वापरला जातो. त्यामुळे या मिठाईत वापरलेलं सोनं ग्राहकांच्या शरीरासाठी चांगलं आणि आरोग्यदायी असल्याचा दावा केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diwali, Diwali Food, Gold, Uttar pardesh