श्रीनगर, 29 मार्च : जम्मू-कश्मीरमधील सोपोरे भागात (Sopore, Jammu Kashmir) दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोपोरमध्ये बीडीसी चेयरपर्सन फरीदा खान (Fareeda Khan) यांच्यावर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. गंभीर जखमी झाल्यामुळे फरीदा खान यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीडीसी चेयरपर्सन यांच्यावर हल्ला केल्यानंतर लष्कर तैनात करण्यात आलं आहे. या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी आणि एक स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये एक पोलीस अधिकारी शहीद झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील सोपेर भागातील लोन बिल्डिंगमध्ये आज सोमवारी काऊन्सिलरची बैठक सुरू होती. यादरम्यान अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन बीडीसी सदस्यांसह पीएसओ जखमी झाले. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना काऊन्सिलरवर गोळीबार सुरू केला. दरम्यान तेथे अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन बीडीसी सदस्यांसह पीएसओ जखमी झाले. दरम्यान पोलिसांमधील एक पीएसओ दहशतवाद्यांच्या चकमकीत गंभीर जखमी झाला.
हे ही वाचा-पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशात हिंसाचार; हिंदू मंदिरं होतायेत लक्ष्य
फरीद खान सुरक्षित, एक पोलीस कर्मचारी शहीद
दहशतवाद्यांनी या हल्ल्यात एक काऊन्सिलर रियाज अहमद आणि पोलीस PSO मुश्ताक अहमद शहीद झाले. तर फरीदा खान यात सुरक्षित आहे. तर अन्य कर्मचाऱ्यांची परिस्थिती नाजूक आहे. पोलिसांनी सांगितलं की, दहशतवादी हल्ल्यात पोलीस कर्मचारी शफाकत अहमद आणि नगरसेवक रियाज अहमद यांचं निधन झालं आहे. नगरसेवक शम्स-उद-दीन पीर यात जखमी झाले आहेत. या घटनेची सूचना मिळताच जवळपासमधील लोक, पोलीस आणि सैन्याचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jammu kashmir