पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशात हिंसाचार; हिंदू मंदिरं होतायेत लक्ष्य

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशात हिंसाचार; हिंदू मंदिरं होतायेत लक्ष्य

PM Modi Bangaldesh Visit : भारताचे पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांचा (Narendra Modi) बांग्लादेश दौरा संपताच तेथे कट्टरपंथीय इस्लामिक गटांनी हिंदू मंदिरांवर हल्ला केला.

  • Share this:

Violence in Bangladesh After PM Modi Visit: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (Narendra Modi) बांग्लादेश दौरा संपताच तेथे कट्टरपंथीय इस्लामिक गटांनी हिंदू मंदिरांवर हल्ला केला. यासोबतच रविवारी देशाच्या पूर्वेकडील भागातील एका ट्रेनवरही निशाणा साधला. (PM Modi Bangaldesh Visit). स्थानिक पत्रकार आणि पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याविरोधात बांग्लादेशातील अनेक भागात निषेध नोंदविला जात होता. अनेक भागात आंदोलनकर्ते हिंसक झाल्याचे पाहायला मिळाले. यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागली.

आतापर्यंत कमीत कमी 10 आंदोलनकर्त्यांचा पोलिसांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हा निषेध कट्टरपंथी इस्लामिक समुहाकडून केला जात आहे. मोदींनी शुक्रवारी बांग्लादेशाच्या 50 व्या स्वातंत्र दिनानिमित्त राजधानी ढाका येथे भेट दिली. दोन दिवसांचा दौऱा पूर्ण केल्यानंतर शनिवारी ते भारतात परतले. (Bangladesh visit of PM Modi). त्यांनी यादरम्यान बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना 12 लाख कोविड-19 लशीचा डोज भेट म्हणून दिला. भारतात मुस्लिमांसोबत भेदभाव होत असल्याचा आरोप बांग्लादेशातील कट्टरपंथीयांकडून केला जात आहे.

हे ही वाचा-या देशात क्वारंटाईन नियमात शिथिलता; पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठा निर्णय

ट्रेनवर केला हल्ला

शुक्रवारी ढाकामध्ये पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी टीयर गॅर आणि रबराच्या गोळ्यांचा वापर केला. ज्यामुळे अनेक लोक जखमी झाले. हजारो इस्लामवादी कार्यकर्त्यांनी शनिवारी चटगांव आणि ढाकाच्या रस्त्यांवर रॅली काढली. रविवारी हिफाजत-ए-इस्लाम समुहाच्या कार्याकर्त्यांनी ब्राम्हणबरियामध्ये एका ट्रेनवर हल्ला केला. ज्यामुळे 10 लोक जखमी झाले. (Bangladesh Protests). एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीखाली सांगितलं की, हल्लेखोरांनी ट्रेनवर हल्ला केला आणि इंजिन रुमबरोबर सर्वत्र मोठं नुकसान केलं.

सरकारी कार्यालयात लावली आग

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार ब्राम्हणबरियाचे पत्रकार जावेद रहीम यांच्या हवाल्याने सांगितलं की, ब्राम्हणबरियात अग्नितांडव सुरू आहे. अनेक सरकारी कार्यालयात आग लावण्यात आली आहे. (Bangladesh Violence). इतकच नाही तर प्रेस क्लबवरदेखील हल्ला झाला आणि यात अनेक लोक जखमी झाले. ज्यात प्रेस क्लबच्या अध्यक्षांचादेखील समावेश आहे. पोलिसांनी सांगितलं की शहरातील अनेक हिंदू मंदिरांवरही हल्ला करण्यात आला.

बसेसना लावली आग

या जमावाने राजशाही शहरातील दोन बसेसना आग लावली. याशिवाय शेकडो आंदोलनकर्त्यांची नारायणगंजमध्ये पोलिसांसोबत हातापायी झाली. यांनी पोलिसांवर दगडफेक केली.

Published by: Meenal Gangurde
First published: March 28, 2021, 5:55 PM IST

ताज्या बातम्या