Home /News /national /

गोमूत्र, शेणामुळे बरा होईल कोरोनाव्हायरस, भाजप आमदाराचा अजब दावा

गोमूत्र, शेणामुळे बरा होईल कोरोनाव्हायरस, भाजप आमदाराचा अजब दावा

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाव्हायरला (Coronavirus) थोपवण्यासाठी आसाममधील भाजप आमदार (BJP MLA) सुमन हरिप्रिया (Suman haripriya) यांनी असा उपचार सांगितला, ज्यामुळे सर्वच हैराण झालेत.

    गुवाहाटी, 03 मार्च : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाव्हायरला (Coronavirus) कसं थोपवता येईल,  यासाठी सर्वच शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत, अद्यापही यावर प्रभावी असा उपचार सापडला नाही. असं असताना भाजप आमदाराने (BJP MLA) कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी असा उपचार सांगितला आहे, ज्यामुळे सर्वच हैराण झालेत. गोमूत्र आणि गाईच्या शेणामुळे कोरोनाव्हाययरस बरा होऊ शकतो, असा अजब दावा त्यांनी केला आहे. आसाममधील (Aasam) भाजप आमदार सुमन हरिप्रिया (Suman haripriya) यांच्या मते, गाईंचं शेण आणि गोमूत्र यामुळे कोरोनाव्हायरस बरा होऊ शकतो. आसाम विधानसभेत गाईंचा बांग्लादेशात होणाऱ्या तस्करीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात. संबंधित - महाराष्ट्रात कोरोनाचा संशयित रुग्ण; तुम्हालाही होऊ शकतो व्हायरस, असा करा बचाव आमदार सुमन हरिप्रिया म्हणाल्या, "गाईचं शेण किती फायदेशीर आहे, आपणा सर्वांना माहितीच आहे. गोमूत्रही शुद्धिकरणासाठी वापरलं जातं. मला वाटतं, याच गोमूत्र आणि शेणामुळे कोरोनाव्हायरसही बरा होऊ शकतो. कोरोनाव्हायरस हवेतून पसरणारा आजार आहे. जर होमहवन केलं तर या व्हायरस पसरणार नाही" भारतातही आता कोरोनाव्हायरसचा धोका वाढला आहे. केरळमधील कोरोनाव्हायरसचे 3 रुग्ण बरे झाल्यानंतर आता दिल्ली, तेलंगणामध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. शिवाय महाराष्ट्रात नाशिकमध्ये संशयित रुग्ण सापडला आहे. राजस्थानच्या जयपूरमध्येही एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं. जगभरात सुमारे 88 हजार लोकं या व्हायरसच्या विळख्यात आहेत. तर 3 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) या व्हायरसला कोविड-19 (COVID 19) असं नाव दिलं आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमधून या व्हायरसचा उद्रेक झाला जो आता तब्बल 70 देशांमध्ये पसरला आहे. संबंधित - कोरोनाव्हायरसवर औषध सापडलं, ‘या’ कंपनीने केला दावा; विषाणूवर उपचार शक्य होणार
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: BJP MLA, Coronavirus

    पुढील बातम्या