नवी दिल्ली, 01 जुलै : पतंजलीच्या (patanjali) कोरोनिल (coronil) मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर आता संपूर्ण देशभरात हे किट उपलब्ध करणार आहे, अशी घोषणा बाबा रामदेव (baba ramdev) यांनी केली आहे. आयुष मंत्रालयाने (ayush ministry) या औषधाच्या विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने औषधाला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषद घेतली.
बाबा रामदेव यांनी कोरोनावरील औषध म्हणून सुरुवातील हे किट लाँच केलं होतं. यानंतर केंद्रीय आयुष मंत्रालय आणि उत्तराखंड आयुष विभागानेही पतंजलीला नोटिस बजावली. पतंजलीने औषध आणि त्याच्या क्लिनिकल ट्रायलचे दस्तावेज सरकारला दिले. यानंतर केंद्राने या औषधाच्या विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. आता हे औषध देशभरात उपलब्ध केलं जाणार आहे.
बाबा रामदेव म्हणाले, "आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार दिव्य कोरोनिल टॅबलेट, दिव्य श्वासारी वटी आणि दिव्य अणु तेल यावर आता प्रतिबंध नाही. याला स्टेट लायसेन्स अथॉरिटी, आयुर्वेद-युनानी सर्व्हिसेस आणि उत्तराखंड सरकारमार्फत उत्पादन आणि वितरणाची पतंजलीला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार संपूर्ण भारतात हे किट उपलब्ध करू शकतो"
श्वसारि और कोरोनिल पर अब कोई प्रतिबंध नहीं, ये दवाएं पूरे देश में मिलेंगी#कोरोनिलविजय #पतंजलिविजय
पूज्य @yogrishiramdev जी
पूज्य @Ach_Balkrishna जी pic.twitter.com/v6pyImqwej
— Patanjali Ayurved (@PypAyurved) July 1, 2020
बाबा रामदेव यांनी सांगितलं, "केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाला आपण आपले क्लिनिकल ट्रायलसंबंधी दस्तावेज दिलेत. यानंतर कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी पतंजली रिसर्च फाऊंडेशनने आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पार पाडलेल्या आहेत, हे आयुष मंत्रालयाने स्वीकारलं आहे"
आयुष मंत्रालय,भारत सरकार को हमने अपने क्लीनिकल कंट्रोल ट्रायल के सभी डॉक्यूमेंट उपलब्ध करा दिए हैं तथा मंत्रालय ने यह भी स्वीकार किया है कि पतंजलि रिसर्च फाउंडेशन ने कोविड-19 के मैनेजमेंट के लिए सभी आवश्यक कार्यवाही संचालित की है
-पूज्य @yogrishiramdev जी#कोरोनिलविजय #पतंजलिविजय pic.twitter.com/UXhxrosPjl
— Patanjali Ayurved (@PypAyurved) July 1, 2020
आम्ही आयुर्वेदिक औषधांचं कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर पहिलं यशस्वी क्लिनिकल कंट्रोल ट्रायल केलं आता आम्ही मल्टिसेंट्रिक क्लिनिकल ट्रायल करणार असल्याचंही रामदेव बाबा यांनी सांगितलं.
हे वाचा - कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या मंत्र्याने मुंबई पोलिसांच्या ‘या’ निर्णयावर टीका
या औषधाला झालेल्या विरोधाबाबत बोलताना बाबा रामदेव म्हणाले, एकिकडे आपण भारतला जागतिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहतो आहे. लोकलला ग्लोबल आणि त्यासाठी वोकल होऊन आत्मनिर्भर भारत बनवतो आहे. यासाठी पतंजली आपलं योगदान देतं आहे, तर काही लोक पतंजलीला दोष लावत आहेत, काही जण जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका सभ्य देशासाठी हे अशोभनीय आहे"
हे वाचा - सर्व काळजी घेतली तरी कोरोनाव्हायरसची कशी झाली लागण? हे आहे महत्त्वाचं कारण
आम्ही भारतातील वेद आणि ऋषी परंपरेचं प्रतिनिधी आहोत. आम्ही कधीच खोटा प्रचार केला नाही आणि करणार नाही. आम्हाला लोकांना हाच विश्वास द्यायचा आहे. काही औषध माफिया आणि स्वदेशी भारतीयविरोधी ताकदीने आम्हाला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आमच्यावर कितीही दगड फेकले, तरी आमचा निश्चय इतका दृढ आहे की याच दगडांचे पायऱ्या बनवून आम्ही आमचं लक्ष्य गाठू, असं बाबा रामदेव म्हणाले.
संपादन - प्रिया लाड