सर्व काळजी घेतली तरी कोरोनाव्हायरसची कशी झाली लागण? हे आहे महत्त्वाचं कारण

सर्व काळजी घेतली तरी कोरोनाव्हायरसची कशी झाली लागण? हे आहे महत्त्वाचं कारण

आपल्या काही सवयी कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण होण्यासाठी कारणीभूत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जुलै : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी तुम्ही मास्क (mask) घालत आहात, हात स्वच्छ धुत आहात, आवश्यक तिथे सॅनिटायझर वापरत आहात, सोशल डिस्टन्सिंगही ठेवत आहात. इतकी सर्व खबरदारी घेऊनही तुम्हाला कोरोनाव्हायरसची लागण झाली. मग यामागे नेमकं काय कारण आहे. याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

न्यूज 18 हिंदीशी बोलताना मेडॉर हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉ. मनोर शर्मा यांनी सांगितलं, "कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी मास्क, ग्लोव्ह्ज आणि सॅनिटाझर यांचा वापर हे आपलं प्राथमिक पाऊल आहे. कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी आपल्याला अधिक खबरदारी घेणं गरजेचं आहे"

हे वाचा - कोरोनाच्या परिस्थितीत स्वत:सह रुग्णाला असं तणावमुक्त ठेवतात डॉक्टर्स; पाहा VIDEO

डॉ. शर्मा पुढे म्हणाले, "आता पाहा अनेक ऑफिस खुले झालेत. अशात जेवणासाठी, चहा पिण्यासाठी ऑफिसमध्ये जी भांडी असतात तीच आपण वापरतो. याच सवयीमुळे कोरोनाची लागण होऊ शकते. याशिवाय ऑफिसमध्ये एकाच कॉम्प्युटरचा वापर अनेक जण करतात. यामुळेदेखील कोरोनाचं संक्रमण वाढू शकतं. ऑफिसमध्ये आपण चहा पितानाही एकत्र पितो आणि त्यावेळी आपल्या चेहऱ्यावरील मास्क हटवतो. यादरम्यान कोरोना संक्रमण पसरण्याची शक्यता वाढते. ऑफिसमध्ये टॉयलेटमध्ये जाता दरवाजा उघडतानाही आपण हँडलला हात लावतो, यावरही कोरोनाव्हायरस असू शकतात"

हे वाचा - सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी आता 'हे' टेडिबिअर करणार मदत

त्यामुळे ऑफिसमध्ये शक्यतो चहासाठी एक कप घेऊन जा. जेवणासाठी स्वत:चं एक ताट घेऊन जा किंवा आहे त्या डब्यातच जेवण करा. तसंच टॉयलेटमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी हात स्वच्छ धुवा आणि टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर हात सॅनिटाइज करा आणि सोशल डिस्टन्सिंगचंही पुरेपूर पालन करा. अशी अतिरिक्त काळजी घेतल्याने आपण कोरोनाव्हायरसपासून आपलं संरक्षण करू शकतो, असा सल्ला डॉ. शर्मा यांनी दिला आहे.

संपादन - प्रिया लाड

First published: July 1, 2020, 3:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading