खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी होणार मोफत, सुप्रीम कोर्टाने यंत्रणा तयार करण्याचे दिले आदेश

खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी होणार मोफत, सुप्रीम कोर्टाने यंत्रणा तयार करण्याचे दिले आदेश

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) अधिकृत खासगी लॅबना मंजूरी दिली होती. यासह प्रत्येक COVID-19 चाचणीची किंमत 4 हजार 500 रुपये निश्चित करण्यात आली.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 एप्रिल : कोरोनाव्हायरसच्या तपासणीसाठी खासगी लॅबमध्ये 4000 रुपये घातले जातात. याविरोधात सुप्रीम कोर्टाने एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीत कोर्टाने स्पष्टीकरण दिले आहे की, कोरोनाची तपासणी करण्यासाठी पैसे घेतले जाणार नाही. कोर्टाने आपल्या सुनावणीत, खासगी लॅब कोरोनाची तपासणी करण्यासाठी रुग्णांकडून पैसे आकारणार नाही. या संबंधित आदेश दिले जातील, असे सांगितले. या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती भूषण यांनी, "खासगी लॅबना कोव्हिड-19ची चाचणी करण्यासाठी लोकांकडून पैसे घेण्याची परवानगी नाही आहे. चाचण्यांसाठी सरकारकडून पैसे घेण्याची यंत्रणा तुम्ही तयार करू शकता", असे स्पष्ट केले.

गेल्या महिन्यात, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) अधिकृत खासगी लॅबना मंजूरी दिली होती. यासह प्रत्येक COVID-19 चाचणीची किंमत 4 हजार 500 रुपये निश्चित करण्यात आली.

4 हजार 500 रुपये देऊन कोरोना विषाणूची तपासणी होऊ शकते. यामध्ये 3 हजार रुपये तापसणी शुल्क आणि 1 हजार 500 रुपये स्क्रीनिंग असा समावेश आहे. तसेच, सरकारने लोकांना गरज नसल्यास चाचणी करू नका, असे आवाहनही केले होते. तपासणी करण्यासाठी डॉक्टरांच्या पत्राची गरज आहे. यानंतर एका याचिकाकर्त्याने तपासणीसाठी पैसे आकारण्यात येत असल्याबद्दल याचिका दाखल होती होती. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने चाचणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे सांगितले.

First published: April 8, 2020, 2:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या