कोरोनाचा परिणाम, लॉकडाऊनमुळे देशातील 12.2 कोटी लोक बेरोजगार

कोरोनाचा परिणाम, लॉकडाऊनमुळे देशातील 12.2 कोटी लोक बेरोजगार

रोजंदारीवर काम करणारे मजूर, लहान उद्योग आणि लघु उद्योगात काम करणारे कामगार अशा तिघांनाही याचा फार मोठा फटका बसला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 मे : चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक देशात आपआपल्या पातळीवर लॉकडाऊन करण्याचे प्रयत्न केले. भारतातही 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 17 मेपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील हा लॉकडाऊन असणार आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले. छोट्या उद्योगांना टाळं लागलं तर काही कंपन्यांनी उलाढालल न झाल्यानं कर्मचारी कमी करणं किंवा पगार न देण्याचं ठरवलं. या कोरोनामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगाराची कामं देखील बंद झाली.

आघाडीच्या क्षेत्रातील थिंक टँकनं दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनमुळे देशातील 12.2 कोटी लोकांच्या रोजगारावर कुऱ्हाड पडली आहे. लॉकडाऊन वाढवल्यानंतर या काळात हातात काम नसणाऱ्या बेरोजगारांची संख्या 12.2 कोटींवर पोहोचल्याची माहिती मिळत आहे. सेंटर ऑफ मॉनिटरिंग इकॉनॉमी या संस्थेनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

हे वाचा-पुण्यातून कोरोनाबाधितांनी धक्कादायक आकडेवारी समोर, नियमही बदलले

रोजंदारीवर काम करणारे मजूर, लहान उद्योग आणि लघु उद्योगात काम करणारे कामगार अशा तिघांनाही याचा फार मोठा फटका बसला आहे. यासोबतच फेरीवाले आणि बांधकम मजूर अशा संघटित क्षेत्रांवरही या लॉकडाऊनचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत असल्याचं CMI नं म्हटलं आहे. तेलंगणामध्ये लॉकडाऊन 29 मेपर्यंत चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन वाढवला आहे. तर देशभरात गृहमंत्रालयाकडून 17 मेपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणखीन लॉकडाऊन वाढवला तर बेरोजगारीचं प्रमाण वाढू शकतं याशिवाय अनेक कंपन्या कर्मचारी कमी करण्याच्या विचारात असल्यानं येत्या काळात बेरोजगारीचं मोठं संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे वाचा-4 हजारांच्या लॉटरीवर ड्रायव्हरनं जिंकले 2 कोटी, 50 वर्षांत केली नाही इतकी कमाई

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 6, 2020, 10:43 AM IST

ताज्या बातम्या