पुण्यातून कोरोनाबाधितांनी धक्कादायक आकडेवारी समोर, नियमही बदलले

पुण्यातून कोरोनाबाधितांनी धक्कादायक आकडेवारी समोर, नियमही बदलले

पुण्यात 76 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून यातील 20 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

  • Share this:

पुणे, 06 मे :  महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पुण्यात गेल्या 24 तासांत 65 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झालीय तर  चार कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यात  76 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुण्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 1943 वर पोहोचली आहे. पुण्यात  कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातही पोहोचला आहे. कोरोनाने वारजे-माळवाडीतील एका 11 वर्षांच्या मुलाचा बळी घेतला आहे. कोरोनामुळे मृत झाल्याची ही या भागातील पहिलीच घटना आहे तर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.

हेही वाचा - 4 हजारांच्या लॉटरीवर ड्रायव्हरनं जिंकले 2 कोटी, 50 वर्षांत केली नाही इतकी कम

या मुलाला काही दिवसांपासून ताप येत होता. त्याच्यावर घरीच उपचार सुरू होता. मात्र, त्याती प्रकृती आणखीच खालावल्याने त्याला पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी सकाळी त्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला. या मुलाच्या संपर्कातील 34 जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

पेट्रोल-डिझेलचा निर्णय मागे

वाढत्या कोरोनारुग्णांचं प्रमाण बघता प्रशासनानं काही नियमात बदल केले आहेत. 69 प्रतिबंधित क्षेत्रात ( Micro containment Zones) निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत. तर उर्वरित ठिकाणी पुणेकरांना थोडा मोकळा श्वास घ्यायला परवानगी देण्यात येणार आहे. तसंच सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल द्यायचा निर्णय मंगळवारी बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर वाहन आणायची परवानगी देणार नसल्याचं सांगितल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय मागे घेत फक्त अत्यावश्यक वाहनांना आणि पासधारकांनाच पेट्रोल डिझेल द्यायचा निर्णय घेतला आहे.प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने नागरिकांच्या गोंधळात भर पडत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 6, 2020, 9:22 AM IST

ताज्या बातम्या