जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यातील MPSC, UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मनसेनं उचललं पाऊल

पुण्यातील MPSC, UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मनसेनं उचललं पाऊल

सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स असा आता फरक राहणार नाही. सगळ्या मुलांना सगळे विषय शिकण्याची सोय राहणार आहे.

सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स असा आता फरक राहणार नाही. सगळ्या मुलांना सगळे विषय शिकण्याची सोय राहणार आहे.

पुण्यातून बाहेर जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 10 मे : पुणे शहरातील एमपीएसी आणि युपीएससी परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी थोड्याच वेळात गावाकडे रवाना होणार आहे. या 44 विद्यार्थ्यांची जाण्याची सोय मनसेकडून करण्यात आली आहे. जळगावला विद्यार्थ्यांची एक बस रवाना होणार आहे. ही बस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बस पाठवली जाणार आहे. पुण्यातून बाहेर जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोन व्यतिरिक्तच्या विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन झाल्यापासून पुण्यात अडकून पडलेल्या या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातून कुणासाठी आहे मोफत बस सेवा? शासन आदेशानुसार देण्यात येणारी मोफत बस प्रवासाची सुविधा केवळ दोन परिस्थितीतच लागू राहील, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. इतर राज्यातील जे मजूर व इतर नागरिक महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेले असतील त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत घेऊन जाणे व महाराष्ट्रातील रहिवासी असलेले मजूर व इतर व्यक्ती जे इतर राज्यांतून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आलेले आहेत, त्यांना त्यांच्या महाराष्ट्रातील जिल्ह्यापर्यंत पोहचविण्याकरताच मोफत बससेवा देण्यात येणार आहे. हेही वाचा - मुंबईतील आणखी एक भयानक VIDEO झाला व्हायरल, मृतदेहाच्या बाजूलाच सुरू आहेत उपचार याशिवाय कोणत्याही इतर प्रवासाकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा मोफत उपलब्ध असणार नाही, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे इतर नागरिकांना आपल्या खिशातून पैसे मोजून इच्छित स्थळी जावं लागणार आहे. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS , pune news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात