मन की बात : लॉकडाऊनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली माफी

'कोरोनाविरोधातील लढाई जिंकायची आहे त्यामुळेच काही कठोर निर्णय घावे लागले. '

'कोरोनाविरोधातील लढाई जिंकायची आहे त्यामुळेच काही कठोर निर्णय घावे लागले. '

  • Share this:
    मुंबई, 29 मार्च : कोरोना व्हायरसचं देशभरात वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. या लॉकडाऊनंतर जनतेला सामोरं जावं लागणाऱ्या समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये जनतेची माफी मागितली आहे. कोरोनाविरोधातील लढाई जिंकायची आहे त्यामुळेच काही कठोर निर्णय घावे लागले. त्याबद्दल मी जनतेची माफी मागतो. लॉकडाऊन करणं गरजेचं होतं अन्य़था कोरोना संसर्ग वेगानं पसरला असता असं ते म्हणाले. 'गेल्या काही दिवसांत मी अशा काही लोकांशी दूरध्वनीवरून बोललो आहे, त्यांचा उत्साह वाढवला आहे आणि त्यांच्याशी बोलण्यानं माझाही उत्साह वाढला आहे. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो.  या लढाईत अनेक योद्धे असे आहेत की जे  घरांच्या बाहेर राहून कोरोना विषाणूचा सामना करत आहेत. जे आमचे आघाडीवरील सैनिक आहेत.  आमच्या परिचारिका भगिनी,  भाऊ, डॉक्टर आहेत, निमवैद्यकीय कर्मचारी आहेत. असे मित्र, ज्यांनी कोरोनाला पराभूत केलं आहे. उपचारांबरोबर रुग्णांचं समुपदेशन पण जास्त गरजेचं आहे. कारण रुग्ण, एकदम ऐकून घाबरतो की आपल्याबरोबर हे काय होत आहे. त्याला समजवावं लागतं की यात काहीच नाही. पुढल्या 14 दिवसात तुम्ही ठीक होऊन आपल्या घरी जाल. अशा पद्धतीनं आम्ही 16 रूग्णांना घरी पाठवलं आहे. आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई जिंकायची आहे. ही लढाई जिंकण्यासाठी लक्ष्मण रेषा पाळायला हवी. काही नागरीक अजूनही लॉकडाऊन गांभीर्यानं घेत नाहीत. कोरोनामुळं कठोर निर्णय घेतले त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना त्रास झाला, याबद्दल माफी मागतो. जर नियमांचं पालन केलं नाही तर कोरोनापासून वाचणं कठीण होईल.' त्यामुळे सरकार आणि पोलिसांच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये केलं आहे.  
    First published: