CoronaVirus : लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त, UNICEF ने सांगितलं घरात बसून काय करायचं

CoronaVirus : लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त, UNICEF ने सांगितलं घरात बसून काय करायचं

दिवसभर घरात राहून नेमकं करायचं काय?, असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) भारतात लॉकडाऊन (India lockdown) आहे. सर्व लोकं घरातच आहेत. काही जण वर्क फ्रॉम होम करत आहेत, तर काहींना ते शक्य नाही, त्यामुळे घरात असंच बसून राहावं लागतं. दिवसभर घरात राहून नेमकं करायचं काय?, असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे.

युनिसेफने (UNICEF) तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. युनिसेफच्या कार्यकारी संचालिका (executive director) हेनरिटा फोरे (Henrietta Fore) यांनी घरात बंद असलेल्या अशाच लोकांसाठी काही टीप्स दिल्यात. दिवस कसा व्यतित करायचा हे सांगितलं आहे.

१) तुम्ही घरात जी दैनंदिन कार्य करता, ती तशीच सुरू ठेवा. त्यामध्ये आणखी काही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. नियमित वेळेत झोपा आणि उठा. अंघोळ करा, स्वत:ची तयारी करा, व्यायाम करा. घरातील कामं करा. या सर्वामध्ये लहान मुलांसह सर्वांना सहभागी करून घ्या.

२) घरात बंदिस्त आहात याचा अर्थ तुम्ही सर्वांशी संपर्क तोडावा असा नाही. व्हिडीओ चॅटमार्फत नातेवाईक, मित्रपरिवार आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांशी जोडलेले राहा. तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा, त्यांच्या भावना तुम्ही जाणून घ्या. विशेषत: जे लोक एकटी राहतात त्यांची विचारपूस करा.

हे वाचा - अवघ्या 5 मिनिटांत होणार Coronavirus चं निदान, शास्त्रज्ञांनी तयार केलं पोर्टेबल टेस्ट किट

३) छंद, तुम्हाला आवडणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये सहभागी व्हा. वाचन करा, स्वयंपाक करा, एखादा खेळ खेळा, एखादी कला असेल तर ती जोपासा.

४) तुम्हाला दिवसभरात कसली कसली चिंता वाटली ते एखाद्या डायरीत लिहून ठेवा आणि त्यावर विचार करण्यासाठी दिवसातील एखादा विशिष्ट वेळ द्या.

५) दररोज तुम्हाला चांगल्या वाटणाऱ्या किमान 3 गोष्टी तरी लिहून ठेवा.

६) पूर्ण दिवस चांगला व्यतित केल्यानंतर स्वत:चं आणि इतरांचंही अभिनंदन करा.

७)  कुटुंब, वाचन, गाणं, हसणं आणि आशा हे संपलेलं नाही, त्यामुळे त्याचा आनंद घ्या.

हे वाचा - Coronavirus चा महाभयानक चेहरा, परिस्थितीनुसार बदलतो रूप

First published: March 29, 2020, 7:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading