जाहिरात
मराठी बातम्या / देश / 1 सप्टेंबरपासून शिक्षकांसाठी शाळा सुरू; या राज्यात शिक्षणमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

1 सप्टेंबरपासून शिक्षकांसाठी शाळा सुरू; या राज्यात शिक्षणमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल त्यावेळी पालकांच्या लिखित पूर्वपरवानगीसह शाळेत यायला परवानगी.

नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल त्यावेळी पालकांच्या लिखित पूर्वपरवानगीसह शाळेत यायला परवानगी.

पुढच्या आठवड्यात राज्यातल्या सर्व शिक्षकांची Covid test होणार आणि 1 सप्टेंबरपासून त्यांनी शाळेत येणं बंधनकारक ठरणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

गुवाहाटी, 18 ऑगस्ट : Coronavirus चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) आता 1 सप्टेंबरपासून शिक्षकांसाठी शाळेत येणं बंधनकारक केलं आहे. आसामच्या शिक्षणमंत्र्यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला. 1 सप्टेंबरपासून आसाममधल्या शाळांमध्ये (Assam school reopening news) सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी काम सुरू करणं आवश्यक असल्याचे हिमंता बिश्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी म्हटलं आहे. अर्थात शाळेत येणं सुरू करण्याअगोदर सर्व शिक्षकांची Covid-19 ची चाचणीही बंधनकारक करण्यात आली आहे. आसामचे शिक्षण आणि आरोग्यमंत्री हेमंत बिश्वा शर्मा यांनी सांगितलं की, येत्या 21 ते 31ऑगस्ट दरम्यान राज्यातल्या सगळ्या शिक्षकांची कोविड चाचणी होईल. ज्या शिक्षकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईल त्या सर्वांनी 1 सप्टेंबरपासून शाळेत येणं आवश्यक आहे. जे शिक्षक उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडायचा निर्णय 25 ऑगस्टनंतर शिक्षकांसाठी शाळा सप्टेंबरपासून सुरू होणार असली, तरी विद्यार्थ्यांसाठी ती याच महिन्यात सुरू करायची की नाही, याचा निर्णय अजून आसाममध्ये झालेला नाही. त्याबद्दल अद्याप काहीच निश्चितता नाही. 25 ऑगस्टनंतरच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ असं मंत्री सांगत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, शर्मा यांनी स्पष्ट केलं. (हे वाचा - कोरोनावर नियंत्रण मिळवल्याबद्दल मुंबईचं कौतुक; पण पुण्यात होताहेत जास्त चाचण्या) केंद्र सरकारची नियमावली लक्षात घेऊन आणि आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईन्स पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल. पण आम्ही सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यासाठी मानसिक तयारी केलेली आहे. शिक्षक सप्टेंबरपासूनच शाळेत यायला लागतील. विद्यार्थ्यांसाठी शाळा कधी सुरू करायची, कशी करायची याविषयी नंतर निर्णय घेऊ, असं ते म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात