मराठी बातम्या /बातम्या /देश /Positive Story: सकारात्मक विचार आणि पोटावर झोपणे या जोरावर 82 वर्षीय आजींची कोरोनावर मात

Positive Story: सकारात्मक विचार आणि पोटावर झोपणे या जोरावर 82 वर्षीय आजींची कोरोनावर मात

Corona Positive Story: 'संसर्ग झाल्यानंतर आईची ऑक्सिजन पातळी एक दिवस 79 वर पोहोचली. आम्ही हार मानली नाही. आम्ही आईला पंलगावर पालथे झोपायला सांगितले.'

Corona Positive Story: 'संसर्ग झाल्यानंतर आईची ऑक्सिजन पातळी एक दिवस 79 वर पोहोचली. आम्ही हार मानली नाही. आम्ही आईला पंलगावर पालथे झोपायला सांगितले.'

Corona Positive Story: 'संसर्ग झाल्यानंतर आईची ऑक्सिजन पातळी एक दिवस 79 वर पोहोचली. आम्ही हार मानली नाही. आम्ही आईला पंलगावर पालथे झोपायला सांगितले.'

  गोरखपूर, 27 एप्रिल : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे (Corona)गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता आणि औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र नकारात्मक चित्र असताना उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh)एक सकारात्मक घटना समोर आली आहे.

  एक वेळ श्वास घेण्यासाठी धडपडत असलेल्या कोरोना ग्रस्त वयोवृध्द महिलेने निश्चय, सकारात्मक विचार, कुटुंबीयांच्या प्रेमामुळे कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. गोरखपूरमधील अलीनगर (Ali Nagar)येथील 82 वर्षीय विद्यादेवी या वयोवृद्ध महिलेने ऑक्सिजन पातळी (Oxygen level)कमालीची घटूनसुध्दा हार मानली नाही. आपला मुलगा शाम यांच्या समर्पक आणि सकारात्मक वृत्तीमुळे (Positive Thinking)आणि धैर्याने या आजीबाईंनी 12 दिवसांत कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकले. त्यांची ऑक्सिजन पातळी 4 दिवसांत 79 वरुन 94 पर्यंत वाढली. विद्यादेवी यांचा मुलगा हरि मोहन यांनी आईसोबत चार दिवस तिच्या खोलीत राहिले. 24 तास 7 दिवस ते आईच्या ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवून होते. त्यांनी केलेली देखरेख आणि आईविषयीचं त्यांचं प्रेम,समर्पण यामुळे विद्यादेवी कोरोनामुक्त झाल्या आणि घरी परतल्या.

  तुम्ही Oximeter चा चुकीचा वापर तर करत नाही ना? केंद्राने सांगितली योग्य पद्धत

  अलीनगर येथील विद्यादेवी यांचा मोठा मुलगा हरि मोहन श्रीवास्तव यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितले की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान माझ्या आईला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरु केले. संसर्ग झाल्यानंतर आईची ऑक्सिजन पातळी एक दिवस 79 वर पोहोचली. यामुळे आम्ही कुटुंबीय घाबरलो. असं असूनही आम्ही हार मानली नाही. आम्ही आईला पंलगावर पालथे झोपायला सांगितले.या पद्धतीने श्वासोच्छवास करण्याच्या पद्धतीला प्रोनिंग (Proning Position) म्हणतात. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचं पातळी वाढतं. हळूहळू तिची परिस्थिती सुधारली आणि चार दिवसांत तिची ऑक्सिजन पातळी 94 वर पोहोचली. ती आता पूर्ण हेल्दी असून तिचीऑक्सिजन पातळी सध्या 97 असल्याचे हरि मोहन यांनी सांगितले.

  कोरोनाची भयंकर परिस्थिती पाहून कोरोना योद्धेही बिथरले! ढासळतंय मानसिक आरोग्य

  हरिमोहन श्रीवास्तव म्हणाले, की आमचे संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह झाले तरी आम्ही आशा सोडली नाही. नेहमीच सकारात्मक विचारांच्या चौकटीत राहण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वांनी योग्य ती काळजी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं (Medicine)घेतली. आता आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य कोरोनामुक्त झाले आहेत.

  कोरोना विषाणूच्या संसर्गापासून कुटुंबातील इतर सदस्यांना वाचवताना माझ्या आईवर उपचार करणे ही माझी जबाबदारी होती. सध्या सर्वत्र असलेले दुसऱ्या लाटेचे प्राणघातक दृश्य पाहून आम्ही देखील खूप घाबरलो होतो. परंतु आम्हाला डॉक्टरांनी धीर दिला. सुचनेनुसार उपचार,सकस अन्नाचे सेवन आणि सकारात्मक विचारांमुळे आता सर्व काही ठिक आहे,असे हरि मोहन यांनी सांगितले.

  First published:

  Tags: Coronavirus, Positive story, Positive thinking