नवी दिल्ली, 27 एप्रिल : "तुम्हाला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असं मी सकाळी एखाद्या रुग्णाला सांगते. परंतु तो दिवस संपण्यापूर्वीच त्याने अखेरचा श्वास घेतलेला असतो आणि त्याचा मृतदेह शवगृहात पोहोचलेला असतो. ही सर्व स्थिती माझ्या समजण्यापलीकडे असते"
मंगळुरूतल्या डॉक्टर कीर्ती कुर्नूल यांचे हे शब्द... डॉ. कीर्ती या सध्या के.एस. हेगडे मेडिकल अकॅडमी तून अॅनेस्थेशिया (Anesthesia)या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहेत. तसेच त्या रुग्णालयातील व्हेन्टीलेटर व्यवस्थेचे काम पाहतात आणि आयसीयू विभागात कार्यरत आहेत.
त्यांनी सांगितलं, "आम्हाला माहित होतं की कोरोनाची दुसरी लाट येणार आहे. परंतु,या लाटेचा वेग आणि दर एवढा असेल याची कल्पना नव्हती. मी सकाळी बरा होण्याच्या मार्गावर असलेला रुग्ण सायंकाळी मृत्यूमुखी पडलेला पाहते. त्यामुळे आजारी रुग्णांसमोर जाताना मला फार असहाय्य वाटत आहे.सध्या एका दिवसात माझ्या समोर 4 ते 5 रुग्णांचा मृत्यू होतो"
"मोठ्या प्रमाणावर लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून आम्ही कमीत कमी स्टाफमध्ये काम करतो. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरला एकावेळी 20 ते 25 रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. मला दिवसभर पीपीई किट आणि एन 95 मास्क परिधान करावा लागतो. त्यामुळे मला गुदमरल्यासारखे होतं. त्यामुळे मी चिंताग्रस्त देखील होते. इतकी दमून गेल्यावरही मी जेव्हा बेंगळुरु येथील माझ्या आई-वडीलांना फोन करते,तेव्हा मला त्यांनी मी उत्तम आहे असंच सांगावं लागतं", असं डॉ. कीर्ती यांनी सांगितलं.
हे वाचा - भीषण! आधी औषधं, मग ऑक्सिजन आणि आता या शहरात लागल्या डेथ सर्टिफिकेटसाठी रांगा!
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Corona Second Wave) भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कोविड-19 ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांवरील (Doctors) दबाव वाढत आहे. त्यामुळे त्यांना शारिरीक आणि मानसिक थकवा आला असून, काही डॉक्टरांवर तर मानसिकदृष्ट्या परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सातत्यानं वाढत असलेलं रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण आणि बिघडत चाललेली आरोग्यविषयक पायाभूत सुविधा यामुळे अनेक डॉक्टरांना मानसिक आरोग्य सल्लागारांची (Mental HealthProfessionals) मदत घ्यावी लागत आहे.
हुबळी येथील मानस नर्सिंग होममधील वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आलोक व्ही. कुलकर्णी याबाबत म्हणाले, या परिस्थितीत अडकलेले मेडिकल स्कूलमधील माझे अनेक डॉक्टर मित्र तसंच वैद्यकीय अधिकारी माझी मदत घेत आहेत. माझ्याकडे येणारे डॉक्टर्स अत्यंत चिंता, थकवा आणि निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त आहेत. यातील काही जण इतके चिंताग्रस्त आणि घाबरलेले आहेत की ते आयसीयूत रुग्णांवर उपचार करताना कोसळले. त्यानंतर त्यांना व्यवस्थापित करण्यासाठी गोळ्या द्याव्या लागल्या. आयसीयू तज्ज्ञ असलेल्या दुसऱ्या एका पेशंटला पॅनिक अटॅकने (Panic Attack) ग्रासलं आहे. रुग्णाला इनट्युबीट करताना दिवसभर त्याचे हात थरथरत होते.
हे वाचा - लाखो खर्चूनही कोरोनाने आईबाबाला हिरावलं; कोरोनाग्रस्त चिमुकल्यानेच दिला मुखाग्नी
रुग्णाचा मृत्यू ही डॉक्टरांसाठी त्यातही भूलतज्ज्ञ आणि आयसीयू तज्ज्ञासाठी (Intensivist) नित्याचीच घटना असते. कोणाला प्राधान्य द्यायचे यासाठी त्यांचा संघर्ष रोजचाच असतो. पण आताचा संघर्ष अधिक कठीण आहे. "एक ज्येष्ठ नागरिक आणि एक लहान मुलगी अशा दोन रुग्णांना व्हेन्टिलेटरची (Ventilator) गरज होती. मात्र त्यावेळी एकच व्हेन्टिलेटर उपलब्ध होता. या स्थितीमुळे माझा एक आयसीयू तज्ज्ञ हवालदिल झाला आणि त्याला रडू कोसळलं", असं डॉ. आलोक यांनी सांगितलं.
डॉ. आलोक म्हणाले, "पहिल्या लाटेदरम्यान डॉक्टरांनी अति काम केलं. परंतु त्यांना थोडा आराम मिळत होता, ते थेरपी घेऊ शकत होते. मात्र दुसरी लाट सुरू होताच यापैकी कोणताही वैद्यकीय व्यावसायिक माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ शकलेला नाही. हे डॉक्टर्स वैयक्तिक बाबी तसंच कुटुंबियांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. कित्येक रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यांना जीवावर उदार होऊन मी वाचवू शकलो असतो, असे विचार घरी गेल्यावरही या डॉक्टरांच्या मनात येतात. यापैकी ज्या डॉक्टरांचे पत्नी किंवा पती वैदयकीय क्षेत्रातील नाहीत त्यांनी आपल्या जोडीदाराची स्थिती पाहून त्यांना घटस्फोट घेण्याची धमकीही दिली होती. अशी वेळ आल्यास सल्ला घेण्याचे मी त्यांना सांगितलं."
हे वाचा - आर्थिक कुचंबणा! ज्या झाडाखाली असायची त्याची नाश्त्याची हातगाडी,तिथेच घेतला गळफास
कोविड-19 मुळे निर्माण झालेली ही स्थिती लवकर सुधारली नाही तर अनेक डॉक्टर्स रुग्ण होतील आणि त्यातील बऱ्याच जणांवर उपचारही होऊ शकणार नाहीत. डॉक्टरांच्या कुटुंबियांनी टेस्ट केल्यानंतर ते सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं परंतु त्यांना देखील वेळेत उपचार मिळाले नाहीत. हे डॉक्टर्स स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून कर्तव्यापुढे वैयक्तिक जीवनातही तडजोड करीत आहेत. डॉक्टरांना कोरोना योद्धे म्हणणं हा त्यांचा सन्मान नाही तर कोरोनाशी लढताना त्यांनी या गोष्टी कधीच मिळवलेल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Coronavirus