भारत कोरोनाला हरवणार, आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आकड्यांतून मिळाला मोठा दिलासा

भारत कोरोनाला हरवणार, आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आकड्यांतून मिळाला मोठा दिलासा

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी एक अत्यंत दिलासादायक आकडेवारी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 एप्रिल : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतातही चिंता निर्माण केली आहे. कारण भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 30 हजारांच्या जवळ जाऊन पोहोचला आहे. अशातच काही तज्ञ तर भारत कोरोना व्हायरसरच्या तिसऱ्या स्टेजमध्ये प्रवेश करत असल्याचा धोका व्यक्त करत आहेत. मात्र अशातच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी एक अत्यंत दिलासादायक आकडेवारी दिली आहे.

'मागील 7 दिवसांपासून देशातील तब्बल 80 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर 47 जिल्हे असे आहेत की जिथे मागच्या 14 दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण आढलेला नाही. तसंच 21 दिवसांपासून देशाच्या 39 जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित नवा रुग्ण आढळलेला नाही. विशेष म्हणजे भारतातील 17 जिल्हे असे आहेत जिथे मागील 28 दिवसांपासून म्हणजेच जवळपास महिनाभरापासून कोरोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही,' अशी माहिती आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसने भारतातीलही अनेक राज्यांमध्ये शिरकाव केला आहे. मात्र युरोपातील देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती अजूनही नियंत्रणात आहे. कोरोना विषाणूविरोधी लढा देशातील प्रत्येक घटक आपापल्या परीने लढतो आहे. मात्र, या लढ्यात सगळीकडेच तंत्रज्ञानाची मोठी मदत मिळत असल्याच दिसत आहे.

हेही वाचा - पालकांनो लक्ष द्या! लहान मुलांमध्ये दिसतायेत Coronavirus ची वेगळी लक्षणं

कोरोनासाठी परवडणाऱ्या चाचणी किटपासून, ते विलगीकरण कक्षामध्ये असलेल्या रुग्णांना अन्न पुरविण्यासाठी वापरले जाणारे रोबो, मोठ्या प्रमाणावरील किराणा माल निर्जंतुक करण्यासाठी 'ड्रोन'च्या माध्यमातून सुरू असलेली औषध फवारणी अशी अनेक उदाहरणे यासाठी देता येतील. देशातील वीसपेक्षा जास्त प्रयोगशाळा आणि संस्था करोनाची लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

कोरोनाने भारताला धडक दिल्यानंतर या व्हायरसचा नाश करण्यासाठी सामान्य लोकही आघाडीवर असल्याचं दिसत आहे. त्यामुळे देशावरील हे संकट दूर करण्यासाठी प्रत्येकजणच या युद्धात उतरल्याचं दिसत आहे. आयआयटीनेही करोनाविरोधी लढ्यासाठी संशोधन केंद्रे सुरू केली आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 28, 2020, 1:39 PM IST

ताज्या बातम्या