वाण सामान देणारा दुकानदारच कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्या शेकडो लोकांचा शोध सुरू

Mumbai: Mahim Dharavi Medical Practitioners' Association members wearing protective suits screen residents of a housing society to detect COVID-19 cases, in Mumbai, Sunday, April 12, 2020. (PTI Photo) (PTI12-04-2020_000140B)

हॉटस्पॉट परिसरात वाण सामान पोहचवणाऱ्या या दोन लोकांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.

  • Share this:
    लखनऊ, 16 एप्रिल : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासन व आरोग्य विभाग सातत्याने दक्षतेसाठी आवाहन करीत आहे. या धोकादायक विषाणूची लागण होऊ नये म्हणून घरात राहून सामाजिक अंतर पाऴावे, असेही सांगितले जात आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये रेशन सामानाचा पुरवठा करणार्‍या व्यक्तीला या धोकादायक विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. अमर उजालाच्या वृत्तानुसार, लखनऊच्या सदर भागात संसर्ग होण्याचा धोका बराच वाढला आहे. हॉटस्पॉट परिसरात वाण सामान पोहचवणाऱ्या या दोन लोकांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. असे सांगितले जात आहे की रेशन पुरवणाऱ्या या युवकाखेरीज त्याचे नोकरही त्याच्या संपर्कात आले असावेत. परिसरात दहशतीचे वातावरण कोरोना रिपोर्ट आल्यानंतर हॉटस्पॉट क्षेत्रात तैनात असलेले डॉक्टर, पोलीस, अधिकारी आणि सफाई कर्मचारी घाबरले आहेत. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली आहे. या भागात गरजूंना कसा पुरवठा केला जाईल याबद्दल अधिकारी चर्चा करत आहेत. पोलिस सूत्रांनी अमर उजाला यांना सांगितले की या व्यक्तीच्या संपर्कात अनेक लोकं आल्याचा धोका आहे. त्यामुळे पोलिसांनी दुकानदारांकडून वाण सामान घेताना सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहान केले आहे. वाचा-धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये 3 तर पालघरमध्ये 10 जणांना कोरोनाची लागण देशात कोरोनाबाधितांची संख्या पोहचली 12 हजारांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सायंकाळपासून कोरोना विषाणूमुळे 39 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 392 पर्यंत वाढला आहे. त्याचबरोबर कोव्हिड-19पासून संसर्ग होण्याच्या 1118 घटनांमध्ये वाढ झाली असून बुधवारी ही प्रकरणे वाढून 12 हजार 380वर गेली आहेत. आतापर्यंच 1 हजार 343 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील एकूण 76 विदेशी नागरिकांचा यात सहभाग आहे. वाचा-महाभयंकर Coronavirus चा नाश कधी होणार? शास्त्रज्ञांनी दिलं असं उत्तर संकलन, संपादन-प्रियांका गावडे.
    First published: