नवी दिल्ली, 25 मार्च : कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) सतत वाढणाऱ्या रुग्णांची संख्या भयावह आहे, परंतु ज्यांनी कोरोनाची (Covid - 19) लढाई जिंकली, त्यांच्याकडून प्रोत्साहन आणि आशा मिळते. आतापर्यंत एकूण 37 जणांनी कोरोनाला पराभूत केले आहे. यापैकी अनेकांचा परदेशातील कोणताही प्रवास झाला नव्हता. अशाच एका रुग्णाने आपले अनुभव शेअर केले आहेत. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने एका कोरोनाची लढाई जिकणाऱ्या रुग्णाशी बातचीत केली.
कोरोनातून बरे झाल्यानंतर त्याच्याशी बोलताना लक्षात आले की तो आग्र्याचा आहे. त्याचे कुटुंबीय इटलीला गेले होते. त्यांच्याकडून या व्यक्तीला विषाणूचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संबंधित - या कर्मचाऱ्यांना बसणार कोरोनाची मोठी झळ, मार्च महिन्याचा पगार कापणार
7 मार्च रोजी या व्यक्तीला कोरोनाबाधित असल्याचे लक्षात आले. त्यानंतर 8 मार्च रोजी तो रुग्ण दिल्लीतील सफदरजंग येथे दाखल झाला आणि सर्वात चांगली बाब म्हणजे 19 मार्च रोजी त्याला घरी सोडण्यात आले.
काय म्हणाला कोरोनातून बरा झालेला रुग्ण
'कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितल्यानंतर खूप घाबरलो होतो. परंतू आता मी कोरोनातून बरा झाल्यानंतर असं लक्षात येत आहे की अशावेळी घाबरुन जाण्याची गरज नाही. वर देव आहे आणि खाली डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी या नात्याने देवाचे दूत आपल्यासाठी उभे आहेत. कोरोनामध्ये क्वारंटाइन हा एकमेव चांगला उपाय आहे, दुसरे काहीच नाही. तुम्ही घरी जसं राहता तसंच आयसोलेशन वॉर्डमध्ये राहा. सुरुवातील आयसोलेशन वॉर्ड भीतीदायक असेल असं वाटतं होतं. मात्र सुरुवातील वाटणारी भीती हळूहळू कमी झाली. वैद्यकीय व्यवस्था तुमच्यासाठी खूप झटत आहे. हा आजार टाळण्यासाठी तुम्ही कुणालाही भेटू नका. कुटुंबाशी फोनद्वारे बोलू शकता. कोरोनातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी असेही सांगितले की, खरंच सांगतो घाबरून जाण्याची गरज नाही. जर कोरोना पॉझिटिव्ह असेल तर डॉक्टरांचे म्हणणे ऐका व सर्वांपासून दूर रहा.
हा तुमच्या आयुष्यातील कसोटीचा काळ आहे, घाबरु नका. मला डॉक्टरांनी क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितलं आहे, त्यानुसार मी त्याचे पालन करत आहे.
संबंधित - तुमचा बरा रुग्ण, पुणेकर दाम्पत्याने कोरोनाला हरवून डॉक्टरांना लिहिलं भावूक पत्र
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.