लॉकडाऊन 2.0 : दारूची दुकानं आजपासून उघडणार? जाणून घ्या सरकारचा निर्णय

लॉकडाऊन 2.0 : दारूची दुकानं आजपासून उघडणार? जाणून घ्या सरकारचा निर्णय

दारूची दुकानं सुरू होणार आहेत की नाही. दारूची दुकानं आणि बार यांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे की नाही?

  • Share this:

नवी दिल्ली, 25 एप्रिल : देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक दुकानं बंद ठेवण्यात आली होती. मात्र आजपासून ही दुकानं सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार काही नियमावली घालून देण्यात आली आहे. या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये हा नियम लागू होणार नाही असे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. तिथे मात्र अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत.

लॉकडाऊनच्या काळात केवळ भाजीपाला, फळे, औषधे आणि किराणा दुकान वगैरे जीवनावश्यक वस्तू उघडण्यास परवानगी होती. केंद्राच्या आदेशानुसार शनिवारपासून, निवासी वसाहती जवळील दुकाने आणि (शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बाहेर असलेली दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी दिल्यानंतर घशाला कोरड पडलेल्या अनेक तळीरामांना प्रश्न पडला आहे की यामध्ये दारूची दुकानं सुरू होणार आहेत की नाही. दारूची दुकानं आणि बार यांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे की नाही?

हे वाचा-सांगलीत प्रवेश करणाऱ्या तरुणीला कोरोनाची लागण, 5 जणांविरोधा गुन्हा दाखल

गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार दारूची दुकानं आणि बार उघडण्याची परवानगी देण्यात आली नाही. ही दुकानं लॉकडाऊन काळात बंद राहतील. त्यांना कोणतीही सूट देण्यात आली नाही. ही सवलत केवळ Shops and Establishment Act अंतर्गत येणाऱ्या दुकानांकरता आहे. त्यातही सरकारनं नियमावली घालून दिली आहे. याचं पालन न केल्यास पुन्हा दुकानं बंद करण्यात येणार आहे. यापूर्वी आसाम आणि मेघालय यांनी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. गृहमंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनंतर 15 एप्रिल रोजी हा आदेश मागे घेण्यात आला.

हे वाचा-स्मशानभूमीत कोणी नाही आलं तर एकटीच घेऊन गेली पतीचा मृतदेह आणि दिला मुखाग्नी

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 25, 2020, 11:21 AM IST

ताज्या बातम्या