सर्वांना चकवा देत सांगलीत प्रवेश करणाऱ्या मुलीला कोरोनाची लागण, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

सर्वांना चकवा देत सांगलीत प्रवेश करणाऱ्या मुलीला कोरोनाची लागण, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबईहून आलेली तरुणी काल कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने हा सगळा प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

सांगली, 25 एप्रिल : शिराळा तालुक्यातील निगडीमधील एक तरुणी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं शुक्रवारी स्पष्ट झालं. याप्रकरणी आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. या तरुणीला काही दिवसांपूर्वी अत्यावश्यक सेवेचा वापर करून मुंबईहून सांगलीला आणण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. मुंबईतून आलेल्या याच तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे.

शिराळा तालुक्यातील निगडी खुर्द येथील त्या कोरोनाग्रस्त तरुणीला आणि तिच्या भावाला मुंबईहून आणणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 व्यक्तींवर शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईहून आलेली तरुणी काल कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने हा सगळा प्रकार समोर आला आहे.

सांगली जिल्ह्याचा धोका कायम

शिराळा तालुक्यातील निगडीमधील एक तरुणी कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबातील 11 जणांना प्रशासनाकडून तात्काळ आयसोलेशन खाली ठेवण्यात आलं आहे. ही तरुणी 16 एप्रिल रोजी मुंबईहून शिराळा तालुक्यातील निगडी या आपल्या गावी आली होती, ती कशी आली याचा तपास झाल्यानंतर पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. शिराळा तालुक्यात फिव्हर क्लिनिकच्या माध्यमातून होत असलेल्या तपासणीत या तरुणीविषयी शंका आल्याने तिचा स्वॅब तपासणी साठी घेण्यात आला होता. त्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

याआधीही जिल्ह्यात घडला विचित्र प्रकार

सांगली जिल्ह्यातल्या खेराडे वांगीतील व्यक्ती मुंबई इथं मयत झाल्यानंतर त्याचे सायन हॉस्पिटल प्रशासनाने स्वॅब घेतले होते. मात्र असं असतानाही या व्यक्तीचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बाहेर का काढले? ही हॉस्पिटलची मोठी चूक असल्याचं कृषी राज्यमंत्री आणि कडेगाव तालुक्याचे आमदार विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे. तसंच यासंदर्भात कदम यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव अजय मेहता यांना एक पत्रही लिहिलं आहे.

खेराडे वांगीतील मृत व्यक्तीवर 19 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार झाले होते. मात्र मृत व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह आहे हे रुग्णालय प्रशासनाकडून 22 एप्रिल रोजी सांगण्यात आले. ही माहिती समोर आल्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील नागरिक पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली असल्याचं पाहायला मिळत आहे. याला सायन हॉस्पिटल जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 25, 2020, 11:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading