भोपाळ, 25 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भीती आहे. सात जन्म साथ देण्याचं वचन देणारा जोडीदार आजारपणात आपल्याला एकटं सोडून गेल्याचं दु:ख पदरात असतानाच त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळही महिलेवर आली आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये घडली आहे. कोरोना संशयित पतीचा मृत्यू झाल्यानंतर महिलेवर आभाळ कोसळलं होतं. कोरोना संशियत असल्यानं मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मदतीला कुणीही सरसावलं नाही. कोलमडून न जाता पत्नीधर्म निभावायचा एवढंच तिच्या डोक्यात होतं. एका मैत्रीणीला हाताशी घेऊन या महिलेनं आपल्या पतीचा मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून विश्रामघाटावर अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेली. महिलेला आपण पतीसोबत घेतलेल्या प्रत्येक वचनाची आठवण होत होती. अखेरच्या श्वासापर्यंत एकमेकांना दिलेलं वचन मोडून पती अर्ध्यावर सोडून गेला होता. अग्निसमोर ज्याच्यासोबत सप्तपदी घेतली आज त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्याची वेळ आली होती. हे वाचा- एका दिवसात 1258 लोकांचा मृत्यू, तरी अमेरिकेसाठी का आहे ही दिलासादायक बातमी? कोरोना संशयित असलेल्या पतीचा मृतदेह घरी नेण्यासाठी डॉक्टरांनी विरोध केला. त्यानंतर महिलेनं रुग्णवाहिकेत आपल्या पतीचा मृतदेह ठेवून विश्रामघाट इथे नेला. तिथे विश्रामघाटावर तीन कर्मचाऱ्यांच्या मदतीनं तिने अंत्यसंस्कार केले. मिळालेल्या माहितीनुसार पतीचा न्युमोनियामुळे मृत्यू झाला होता. पण त्याचे कोरोनाचे अहवाल येणं बाकी होतं. त्याआधीच मृत्यू झाला होता. त्यामुळे एकट्या महिलेनं आपल्या पतीचे अंत्यसंस्कार केले. हे वाचा- उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आणि…, महाविकास आघाडीचा ‘प्लॅन बी’ संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.