नवी दिल्ली, 11 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरसचा देशात वेगानं वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी आज पुन्हा मोठी घोषणा कऱण्याची शक्यता आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले होते. मात्र राज्यातील स्थितीवरही प्रत्येक राज्य पंतप्रधानांसोबत चर्चा करून निर्णय घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. ओडिसा आणि त्यापाठोपाठ पंजाबनेही 1 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनसंदर्भात बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. लॉकडाऊनबाबत सस्पेन्स संपणार संपूर्ण देशभरात लॉकडाऊन वाढवला जाणार आहे का? तो किती दिवसांसाठी असेल आणि कसा असेल याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोठी बोलणार आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यानुसार लॉकडाऊनचे नियम बदलणार आहेत की देशभरात एकाच पद्धतीनं लॉकडाऊन पाळायचा याबाबतची आज महत्त्वाची घोषणा होणार आहे. त्यामुळे हा सस्पेन्स संपणार आहे. हे वाचा- तयारी असेल तरच लॉकडाऊन हटवा नाहीतर…, WHOने दिला इशारा
भारतात 24 तासांत 1035 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे 7 हजार 400 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 6565 रुग्णांवर सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये उपचार सुरू आहेत. 643 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. हे वाचा- त्याने कोरोनाला हरवलं, अवघं शहर सुरक्षित झालं!