नवी दिल्ली, 13 एप्रिल : देशात कोरोनामुळे लॉकडाऊन असताना इंटरनेट वापराबाबत धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. याआधी पॉर्नहबने दिलेल्या आकडेवारीत भारतात सर्वाधिक अडल्ट कंटेंट पाहण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं होतं. आता त्यानंतर चाइल्ड पॉर्नोग्राफीची मागणी वाढल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन फंड (आयसपीएफ) ने हे सांगितलं आहे. आयसीपीएफने म्हटलं की, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन झाल्यानंतर चाइल्ड पॉर्नोग्राफी कंटेंटच्या मागणीत वाढ झाल्याचं बघायला मिळालं.
आयसीपीएफने म्हटलं की, सोशल इम्पॅक्ट फंडाच्या अहवालात लॉकडाऊननंतर ऑनलाइन डेटा मॉनिटरिंग वेबसाइटची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये चाइल्ड पॉर्न, सेक्सी चाइल्ड आणि टीन सेक्स व्हिडिओ हे सर्वाधिक शोधण्यात आलं आहे. जगातील सर्वात मोठी पॉर्न साइट असलेल्या पॉर्नहबच्या डेटामध्येही याच गोष्टी पुढे आल्या होत्या. आधीपेक्षा 24 ते 26 मार्च दरम्यान अड़ल्ट कंटेंट पाहण्याचं प्रमाण जवळपास 95 टक्के वाढलं असल्याचं पॉर्नहबने म्हटलं होतं.
देशातल्या शंभर शहरांमध्ये रिसर्च
देशभरातील शंभर शहरांच्या रिसर्चमधून ही धक्कादायक आकडेवारी आणि माहिती समोर आली आहे. यामध्ये देशात चाइल्ड पॉर्नोग्राफीची मागणी सर्वाधिक चेन्नई आणि भुवनेश्वर या दोन शहरांमधून होत आहे. तर यासंबंधीत कंटेंट शोधण्यामध्ये कोलकाता, सिलीगुडी, हावडा, चंदीगढ, गुवाहाटी, इंदौर, भुवनेश्वर आणि चेन्नई आघाडीवर आहे.
उत्तर भारतात नवी दिल्ली, लुधियाना, रायपुरा, लखनऊ, चंदीगढ, आगरा, शिमला इथं चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या शोधात वाढ झाली आहे. याशिवाय रायपूर रांची आणि इंदौर या शहरांचाही समावेश आहे. पुर्वेकडील इंफाळ, गुवाहाटी, कोलकाता, हावडा आणि शिलाँग शहरांमध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या मागणीत वाढ झाली आहे. तर दक्षिण भारतात बेंगळुरू, कोच्ची आणि तिरुवअनंतपुरम ही शहर आहेत.
महाराष्ट्रातील चार शहरं
महाराष्ट्रातही चार शहरांची नावेही यामध्ये आहेत. लॉकडाऊनच्या काळात चाइल्ड पॉर्नोग्राफी सर्च करणाऱ्यांच्या यादीत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा समावेश आहे. याशिवाय ठाणे, पुणे आणि अहमदनगर या शहरांमधूनही चाइल्ड पॉर्नोग्राफीसह अडल्ट कंटेंट लॉकडाऊनच्या काळात पाहिला जात असल्याचं समोर आलं आहे.
हे वाचा : कपल्सचं खाजगी बोलणं असो वा ऑफिसची मीटिंग, कोणतं App व्हिडीओ कॉलसाठी सुरक्षित?
इंडिया चाइल्ड़ प्रोटेक्शन फंडच्या प्रवक्त्या निवेदिता आहुजा यांनी यावर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, एकीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन आणि दुसरीकडं राष्ट्रीय नियमांचेही उल्लंघन केलं जात आहे. पॉर्नोग्राफिक साइट फक्त त्यांचा युआरएल बदलून भारतीय कायदे आणि न्यायव्यवस्थेविरुद्ध लोकांना कंटेंट पुरवत आहे. भारत सरकारने चाइल्ड पॉर्नोग्राफीविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे तसंच लैंगिक शोषण करणाऱ्या कंटेंट विरुद्ध जागतिक स्तरावर पावले उचलायला हवीत असंही त्या म्हणाल्या.
हे वाचा : पॉर्न साइटवर बंदी असून पाहण्यात भारतीय जगात अव्वल, Lockdown मध्ये प्रमाण वाढलं
अडल्ट साइटवरून लाखो चाइल्ड पोर्नोग्राफीक पाहणाऱ्यांना, बलात्काऱ्यांना आणि इतर लोकांना ऑनलाइन कंटेंट मिळत आहे. यामुळे लहान मुलांसाठी इंटरनेट या दिवसांत धोकादायक ठरत आहे. तसंच वेळेत यांच्यावर कठोर कारवाई केली नाही तर मुलांच्या लैंगिक शोषणाचे गुन्हे वाढण्याची भीतीही आहुजा यांनी व्यक्त केली.
हे वाचा : कॉल ड्रॉप किंवा आवाज कट होतोय का? तुमच्या स्मार्टफोनवर असलेलं 'हे' फीचर वापरा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus