लेकींच्या खांद्यावरून बापाचा शेवटचा प्रवास, मुलींनी केले अंत्यसंस्कार

लेकींच्या खांद्यावरून बापाचा शेवटचा प्रवास, मुलींनी केले अंत्यसंस्कार

लॉकडाउनच्या काळात वेळत उपचार न मिळाल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर लेकींनीच त्याच्या पार्थिवाला खांदा दिल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

लखनऊ, 05 एप्रिल : कोरोना व्हायरसचं जगभर संक्रमण झालं आहे. यामुळे आतापर्यंत जगात 60 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर औषध उपलब्ध नसल्यानं त्यावर सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे अनेक देशांनी लॉकडाउन केलं आहे. भारतातही 21 दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आलं आहे. या लॉकडाउनमुळे कोरोनाला अटकाव झाला आहे. पण त्याचबरोबर अनेक गंभीर प्रसंगही समोर येत आहेत. उत्तर प्रदेशात एका सुनेनं तिच्या सासूच्या पार्थिवाला खांदा दिल्याची घटना घडली होती. त्यानंतर तिथेच मुलींनी बापाच्या पार्थिवाला खांदा दिला आहे.

उत्तर प्रदेशातील अलिगड इथं राहणाऱ्या संजय कुमार यांचा मृत्यू झाला. टीबीचा आजार असलेल्या संजय कुमार यांचा उपचाराअभावी शनिवारी मृत्यू झाला. संजय कुमार यांना पाच मुली असून त्यांनीच अंत्यसंस्काराचा विधी केले. मुलींनीच वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला.

चहाचा गाडा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱे संजय कुमार हे गेल्या सहा महिन्यांपासून टीबीने त्रस्त होते. त्यांना वेळोवेळी उपचारासाठी रुग्णालयात न्यावं लागत होतं. ती जबाबदारीसुद्धा मुलीच पार पाडत होत्या. लॉकडाउनच्या काळात त्यांना उपचार वेळेवर मिळू शकले नाहीत. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

हे वाचा : धक्कादायक माहिती उघड, अवघ्या 45 मिनिटांत झाली असती कोरोनाची चाचणी; पण...

दरम्यान, संजय कुमार यांच्या मुलींनी अशा प्रसंगातही धैर्य दाखवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. पार्थिवाला खांदा पुरुष मंडळींनी देण्याची प्रथा जरी असली तरी सद्याच्या परिस्थितीत प्रथा परंपरांपेक्षा आलेल्या संकटाला सामोरं जाणं त्यांनी महत्वाचं समजलं.

हे वाचा : कोरोनाशी लढण्यासाठी मोदींकडे ट्रम्प यांनी मागितलेलं औषध कोणतं?

First published: April 5, 2020, 4:58 PM IST

ताज्या बातम्या