इंदोर, 9 एप्रिल : Coronavirus ने देशात 166 जणांचा बळी घेतला आहे. भारतात पहिल्या डॉक्टरचा कोरोनामृत्यू मध्य प्रदेशात इंदोरमध्ये नोंदला गेला. मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिस करणारे डॉ. शत्रुघ्न पंजवानी यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. पण मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर त्यांनी शेअर केलेला एक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 'मी एकदम फिट आहे, मला काही झालेलं नाही', असं या व्हिडीओमध्ये सांगणाऱ्या डॉ. पंजवानी यांचा दोनच दिवसांपूर्वी COVID-19 च्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
कोरोनामुळे मृत्यू झालेले ते पहिले डॉक्टर आहेत. मात्र ते कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्यांपैकी नव्हते. पंजवानी यांचा 9 एप्रिलला मृत्यू झाला असून आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यावर आधी गोकुलदास विभागात आणि त्यानंतर सीएचएलमध्ये उपचार सुरू होते. त्यांनतर त्यांना अरविंदो हॉस्पिटलमध्ये हलण्यात आलं होतं आणि आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
डॉ. पंजवानी इंदौरमधील रुपराम नगरमध्ये राहत होते. इंदौर शहर कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरलं आहे. अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत एकदम फिट दिसणाऱ्या व्यक्तीचा कोरोनामुळे असा अचानक मृत्यू कसा होऊ शकतो, यावर या VIDEO मुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
इंदौरमध्ये Covid-19 मुळे मृत्यू झाला त्या डॉक्टरांचा हा काही दिवसांपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 'मला काही झालं नाहीये. मी एकदम फिट आहे', असं सांगणाऱ्या या डॉक्टरांची दोनच दिवसांपूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. #CoronavirusOutbreak pic.twitter.com/pkgxj6JqLD
— Manoj Khandekar (@manojkhandekar) April 9, 2020
आतापर्यंत याठिकाणी 22 जणांचा मृत्यू झाला आहे. इंदौरमध्ये याआधी बुधवारी दोन IPS अधिकाऱ्यांना कोरोना झाल्याचं देखील निदर्शनास आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार यातील एक अधिकारी भोपाळमध्ये कार्यरत आहे तर दुसरे अधिकारी इंदौरमध्येच कार्यरत आहेत. याआधी दोन IAS अधिकारीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.
बुधवारी रात्रीपर्यंत मध्यप्रदेशात एकूण 385 लोकं कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यातील 213 इंदौरमधील आहेत. तर 94 भोपाळमधील आहेत. आतापर्यंत एकूण 29 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाच्या हॉटस्पॉट परिसरांपैकी इंदौर हे एक महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे शहरामध्ये चिंतेचं वातावरण आहे.
अन्य बातम्या
SALUTE! मुलासाठी आईनं लॉकडाऊनमध्ये दुचाकीवरुन केला 1400 किमीचा प्रवास
लॉकडाऊन हटवताच चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा भडका, एका दिवसात 63 कोरोना पॉझिटिव्ह